पश्चिम महाराष्ट्र

कऱ्हाड : महाविद्यालयीन मुलींच्या गटात राडा

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : महाविद्यालयात शिकाणाऱ्या युवतींच्या दोन गटांत राडा झाला. येथील एका महाविद्यालयाबाहेर रस्त्यावरच मुलींमध्ये मारामारी झाली. ती थेट पोलिस ठाण्याच्या दारात पोचली.

येथील विद्यानगर परिसरात दररोज सुमारे तीस हजार विद्यार्थी - विद्यार्थींनीनी शिक्षणाच्या निमित्ताने येत असतात. या विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी एसटीची पुरेशी सुविधा उपलब्ध नसल्याने अनेक वेळ एसटीमध्ये चढण्यावरुन किरकोळ बाचाबाची होत असते.

जरुर वाचा -  टॅक्‍सी चालकाचा प्रामाणिकपणा, 13 लाख केले परत

एसटीत जागा मिळावी म्हणून एसटी येण्यापुर्वीच रस्त्यावर प्रचंड गर्दी झालेली असते. अशावेळी गट करुन दुसऱ्या गटाला खून्नस देत एसटीत चढण्यासाठी मुला-मुलींची धडपड सुरु असते. यातूनच मग किरकोळ प्रकार घडत असतात. तशाच प्रकारे एसटीमध्ये चढण्यावरुन, झालेल्या धक्काबुक्कीतून व बाकड्या वरती बसण्यावरुन महाविद्यालयीन युवतींच्या दोन गटांमध्ये मारामारी झाली. या मारामारीची चर्चा पसरताच घटनास्थळी मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी झाली. 

मारामारीच्या ठिकाणी तातडीने पाेलिस पाेहचले. त्यांनी युवतींना पाेलिस ठाण्यात नेले. तेथेही युवतींमध्ये भडका उडाला. शाब्दिक चकमकी झडू लागल्या. त्यांच्यात जोरात वाद सुरू होताच पोलिसांनी पुन्हा हस्तक्षेप केला. या घटनेची नाेंद मात्र झालेली नाही.

हेही वाचा - सेना आमदाराच्या तक्रारीवर एसपींचे हे उत्तर 

विशेष म्हणजे विद्यार्थिनींवर वाढत्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी काही महाविद्यालयीन विद्यार्थिनींना प्रबोधन केले होते आणि त्याच दिवशी संध्याकाळी हा प्रकार घडल्याने कॉलेज परिसरासह शहरात चर्चा सुरू होती.

नक्की वाचा - Video : मुली म्हणतात...अब हम से है मुकाबला !

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मराठा समाजातील लोकांवर लाठीमार-गोळीबार, फडणवीसांनी मराठ्यांना गृहीत धरू नये'; सतेज पाटलांचा इशारा

Latest Maharashtra News Updates live : पुण्यात औंध येथे अडीच किलो सोने जप्त

Raj Thackeray: एकदा सत्ता माझ्या हातात द्या, मशिदींवरील भोंगे ४८ तासांत उतरवू

Snapchat New Feature : खुशखबर! स्नॅपचॅटमध्ये आलं भन्नाट फीचर; तुम्ही पाहिलं काय?

Michael Waltz : मायकेल (माइक) वाल्ट्झ- `इंडिया कॉकस’ व भारत

SCROLL FOR NEXT