इस्लामपूर : जूनमध्ये सुरू होणाऱ्या शाळांच्या नवीन सत्रात विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी झाली, तर शिक्षकांना बदली किंवा समायोजनाला सामोरे जावे लागते. तेव्हा पुरेसे विद्यार्थी मिळवण्याचा शिक्षकांचा प्रयत्न आहे.
माध्यमिक शाळांच्या चालकांनीही शिक्षकांना नोकरी टिकवायची असेल तर विद्यार्थी शोधा, असे फर्मानच काढल्यामुळे संबंधित शिक्षकांना उन्हाळी सुटीत विद्यार्थी शोधमोहिमेवर फिरावे लागत असल्याचे चित्र तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरातही आहे.
इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या स्पर्धेत जिल्हा परिषद शाळांसह खासगी मराठी शाळांनाही आता विद्यार्थी मिळणे कठीण झाले आहे. तेव्हा येत्या महिनाभरात सुरू होणाऱ्या शाळांच्या नव्या सत्रात विद्यार्थी मिळवण्यासाठी शिक्षक शोधमोहिमेत व्यस्त आहेत. त्यासाठी त्यांनी विविध फंडे अवलंबण्यास सुरवात केली आहे.
विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बॅग, स्कूल बस, पुस्तके, गणवेश, बूट, याशिवाय विविध प्रलोभने दाखवली जात आहेत. विद्यार्थी व पालकांचा कल इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे आहे. पाल्याला चांगले शिक्षण मिळावे, यासाठी इंग्रजी शाळेत प्रवेशासाठी पालकांची धडपड सुरू आहे.
त्याचा परिणाम जिल्हा परिषदेच्या शाळांवर होत आहे. विद्यार्थी मिळवणे व टिकवणे यासाठी धावाधाव करावी लागत आहे. पटसंख्या कमी झाली तर बदली होते किंवा समायोजन या संकटाला सामोरे जावे लागते. तेव्हा पुरेसे विद्यार्थी मिळवण्याचा शिक्षकाचा प्रयत्न आहे.
माध्यमिक शाळांच्या चालकांनी याबाबत फर्मानच काढले आहे. त्यामुळे बहुसंख्य शाळांमधील शिक्षक सकाळी व सायंकाळी शहर व ग्रामीण भागात वस्त्यांमध्ये, दुर्गम भागातील वाड्यावस्त्यांवर विद्यार्थी शोधताना दिसून येत आहेत. त्यामुळे शिक्षकांच्या कामावर हा नवीन ताण आलेला दिसत आहे.
ग्रामीण भागातून शहरात येण्यासाठी मोफत बस सुविधा
विद्यार्थ्यांचा वर्षभरातील शैक्षणिक खर्च संस्था करणार
शिक्षक स्वखर्चाने विद्यार्थी शोधमोहीम राबवत आहेत
विद्यार्थ्यांचे जन्म दाखले मिळवण्यापासून पुढील वर्षात प्रवेश देण्यासाठी शिक्षकांचे प्रयत्न
इंग्रजी माध्यमाच्या शाळांची स्पर्धा
जिल्हा परिषद शाळेमधील शिक्षकांची अपुरी संख्या
काही ठिकाणी दोनच शिक्षक (पहिली ते सातवी)
विद्यार्थ्यांना असणाऱ्या तोकड्या सुविधा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.