पश्चिम महाराष्ट्र

कृष्णेत सापडला उपद्रवी आणि घातक असा मासा

कधीकाळी फिशटँकमध्ये शोभिवंत म्हणून ठेवला जाणारा मासा अलिकडे पाळला जात नाही

सकाळ डिजिटल टीम

सांगली : हरिपूर (ता. मिरज) येथे कृष्णा नदीत उपद्रवी तसेच धोकादायक समजला जाणारा दोन फुट लांबीचा सकर अर्थात हेलिकॉप्टर मासा (helicopter fish) आज मच्छिमार विकास नलवडे यांना जाळ्यात सापडला. हा मासा पाहण्यासाठी परिसरात गर्दी झाली होती. कधीकाळी फिशटँकमध्ये शोभिवंत म्हणून ठेवला जाणारा मासा अलिकडे पाळला जात नाही. कृष्णानदीत (krishna river) पहिल्यांदाच हा मासा सापडल्यामुळे आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

सोलापूर जिल्ह्यातील (solapur district) उजनी जलाशयात गेल्या काही महिन्यापासून सकर अर्थात हेलिकॉप्टर मासे मोठ्या संख्येने सापडू लागल्यामुळे मच्छिमार वैतागले आहेत. सकर मासा उपद्रवी व घातक समजला जातो. हा मासा इतर मासे व त्यांची अंडी खातो. त्यामुळे इतर माशांच्या प्रजाती तेथे धोक्यात आल्या आहेत. जलदगतीने वाढणाऱ्या या माशाच्या अंगाला काटे असल्यामुळे तो जाळ्यात अडकल्यानंतर सहजपणे निघत नाही. तसेच जाळी फाडावी लागते. तसेच बाजारात मागणीही नसते. त्यामुळे उजनी परिसरातील मच्छिमार त्याला वैतागले आहेत. असा हा धोकादायक मासा कृष्णानदीत प्रथमच सापडल्याचे निदर्शनास येत आहे.

हरिपूर येथील विकास नलवडे यांना आज जाळ्यामध्ये हा वेगळ्या प्रकारचा मासा सापडला. त्याची पाहणी केल्यानंतर तो सकर अर्थात हेलिकॉप्टर मासा म्हणून ओळखला जात असल्याची माहिती मिळाली. हा मासा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. आपल्याकडे प्रथमच हा मासा सापडल्यामुळे तो दूर्मिळ असल्याची चर्चा सुरू होती. परंतू या माशाची माहिती तपासल्यानंतर तो धोकादायक असल्याचे निष्पन्न होते. मांगूर जातीच्या माशाप्रमाणेच तो धोकादायक मानला जातो. त्यामुळे कृष्णानदीत त्याची मोठ्या प्रमाणात पैदास झाली असेल तर भविष्यात इतर माशांना त्याचा धोका आहे. तसेच मच्छिमारांसाठी धोक्याची घंटा म्हणावी लागेल.

जमिनीबाहेर चार तास जीवंत

सकर मासा टणक असल्यामुळे तो इतर माशांपेक्षा अधिक सुरक्षित राहतो. तो जमिनीवर चार तासापर्यंत जीवंत राहू शकतो. तसेच जमिनीवर नागमोडी वळण घेत चालू शकतो. अंगावरील काट्यामुळे त्याला ग्राहक नसतात. तो मच्छिमारांच्या जाळ्यात अडकल्यानंतर काढताना जाळे फाटू शकते.

फिशटँक ते नदीत

कधीकाळी हा मासा फिशटँकमध्ये पाळला जात होता. परंतू नंतरच्या काळात विविध प्रकारच्या माशांनी फिशटँकमध्ये स्थान मिळवल्यामुळे सकर मासा दुर्लक्षित बनला. अनेकांनी नदीत किंवा खाडीत ते सोडून दिले. त्यामुळे नदीत त्याची पैदास वाढत असल्याचे सांगण्यात येते.

म्हणून हेलिकॉप्टर नाव

सकर माशाचे पर पंख्यासारखे असतात. कधी-कधी हे मासे पाण्यातून बाहेर हेलिकॉप्टरप्रमाणे झेपावतात. त्यानंतर फुफ्फुसात हवा भरून पुन्हा पाण्यात जातात. त्यामुळे फ्लाईंग फिश तसेच हेलिकॉप्टर मासा म्हणून ओळखले जाते. तो कॅट फिश प्रकारात मोडतो. त्याचे वैज्ञानिक नाव एक्झोसिटस असे आहे. तर इंग्रजीत ‘सकर माऊथ कॅट फिश’ संबोधले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT