Former Mayor Vivek Kamble Passed Away esakal
पश्चिम महाराष्ट्र

RPI Athawale Group : आंबेडकरी चळवळीतला लढाऊ नेता हरपला! माजी महापौर विवेक कांबळेंचं पुण्यात निधन

कांबळे यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीतील लढाऊ अभ्यासू नेता हरपल्याची भावना सर्वस्तरांतून व्यक्त केली जात आहे.

सकाळ डिजिटल टीम

आंबेडकरी चळवळीत त्यांनी नेहमीच विद्यमान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे नेतृत्व मानून काम केले.

मिरज : रिपब्लिकन पार्टी ऑॅफ इंडियाचे (Republican Party of India Athawale Group) प्रदेश उपाध्यक्ष, माजी महापौर विवेक आप्पा कांबळे (वय ६७) यांचे पुणे येथे काल सकाळी निधन झाले. गेल्या महिन्यात १६ नोव्हेंबरला सकाळी फिरण्यासाठी गेले असताना दुचाकीस्वाराने धडकेत ते गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर पुण्यात एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

त्यांच्या (Vivek Appa Kamble) निधनाने आंबेडकरी चळवळीतील लढाऊ अभ्यासू नेता हरपल्याची भावना सर्वस्तरांतून व्यक्त केली जात आहे. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, दोन मुली, बहीण, भावंडे असा मोठा परिवार आहे. रात्री उशिरा येथील कृष्णाघाटावर अंत्यसंस्कार झाले. रविवारी (ता. १७) जलदान विधी आहे.

श्री. कांबळे यांचे वडील आप्पा रेल्वेत चतुर्थ श्रेणी कर्मचारी, तर आई हौसाबाई यांनी मोलमजुरी करून चार मुली आणि चार मुलांचा संसार उभा केला. परिस्थितीने विवेक कांबळे यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले. मात्र शालेय वयात ते आंबेडकरी चळवळीत सहभागी झाले. वयाच्या सोळाव्या वर्षापासून ते विविध आंदोलनात सक्रिय होते.

१९७२ च्या दुष्काळात त्यांनी दलित कुटुंबांना रोजगार हमीची कामे मिळवताना शासनस्तरावर संघर्ष केला. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर चळवळीत पश्‍चिम महाराष्ट्रातून ते शेकडो कार्यकर्त्यांसह वेळोवेळी सहभागी झाले. भारतीय दलित पँथरचे जिल्ह्याचे संस्थापक-अध्यक्ष होते. आंबेडकरी चळवळीत त्यांनी नेहमीच विद्यमान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे नेतृत्व मानून काम केले.

सुरवातीच्या काळात दलित पॅंथरच्या चळवळीत ते जिल्ह्यात अग्रणी होते. आक्रमक वक्तृत्व आणि संघटनाच्या बळावर त्यांनी गावागावांत पक्षाच्या शाखा काढल्या. एकीकडे पक्षीय पातळीवर काम करताना त्यांनी मिरज नगरपालिकेतही प्रवेश करीत निवडणुका जिंकत यशस्वी राजकारण केले.

नगरपालिका ते महापालिका या काळात त्यांना सात वेळा प्रतिनिधित्वाची संधी मिळाली. नेते मदन पाटील यांनी त्यांना २०१४ मध्ये त्यांना महापौरपदाची संधी दिली. ती त्यांनी यशस्वीपणे सांभाळली. रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष, प्रदेश उपाध्यक्ष, कोल्हापूर जिल्ह्याचे निरीक्षक अशा जबाबदाऱ्यांनी त्यांनी दीर्घकाळ सांभाळल्या. जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे माजी जिल्हाध्यक्ष होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT