Four people, including two children, drowned in three incidents in Sangli district. 
पश्चिम महाराष्ट्र

सांगली जिल्ह्यात तीन घटनांमध्ये दोन लहान मुलांसह चौघे बुडाले

तानाजी टकले

सांगली ः जिल्ह्यात आज विविध ठिकाणच्या तीन घटनांमध्ये चौघांचा बुडून मृत्यू झाला. यामध्ये दोन तरुण व दोन लहान मुलांचा समावेश आहे. मिरजवाडी, समडोळी व विटा येथे या घटना घडल्या. या सर्व घटना पोहायला गेल्यानंतर घडल्या आहेत. 

आष्टा : मिरजवाडी (ता. वाळवा) येथे शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन कामगार तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. अजय विजय भिसे (वय 25) व अजिंक्‍य रमेश जाधव (वय 24, दोघे मूळ सांगवी (पुणे), सध्या मिरजवाडी, ता. वाळवा) अशी मृतांची नावे आहेत. गुरुवारी सकाळी सव्वा नऊच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी विजय महादेव भिसे (वय 60) यांनी आष्टा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांत घटनेची नोंद झाली. 


पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की विजय भिसे त्यांच्या दोन मुलांसह कामगारांना सोबत घेऊन सार्थक ग्रीन टेक ऍग्रो सर्व्हिस कंपनी (पुणे) यांच्याकडे काम करतात. कंपनीमार्फत ते एक महिन्यापासून तुंग येथील विकास नलवडे यांनी भाडेतत्त्वावर घेतलेल्या मिरजवाडी येथील अनिल शामराव गायकवाड यांच्या शेतातील पॉलिहाउसमध्ये काम करतात. या कामासाठी विजय, मुलगा अजय, कामगार अजिंक्‍य जाधव, एडबीन जूल्स असे आले आहेत. आज सकाळी नऊच्या सुमारास सर्वजण शेततळ्याच्या बाजूला असलेल्या पॉलिहाउसमध्ये काम करीत होते.

साडेनऊच्या सुमारास शेततळ्यात अजय, अजिंक्‍य, शुभम जगन्नाथ गायकवाड हे तिघे पोहण्यास गेले. अजिंक्‍यला पोहता येत नव्हते. अजय व शुभम हे पोहत होते. अजिंक्‍य हा पाण्यात पाय घसरून पडला. पोहता येत नसल्याने त्याने अजयला पकडले. दोघेही पाण्यात बुडू लागले. 
शुभम रस्सी पकडून वर आला. अजय व अजिंक्‍य हे पाण्यात बुडालेले पाहून धावत येत शुभमने ही माहिती विजय यांना दिली. विजय शेततळ्याजवळ आले असता काहीही दिसले नाही. शुभमच्या हाका ऐकून नागरिक जमले. आष्टा पोलिसांना माहिती देण्यात आली. मिरजवाडीचे पोलिस पाटील हरीदास पाटील व पोलिस घटनास्थळी आले. सकाळी 11 च्या सुमारास दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. पोलिस हवालदार ताकतकर तपास करीत आहेत. 


समडोळी येथे नदीत विद्यार्थी बुडाला 

तुंग : समडोळी (ता. मिरज) येथील वारणा नदीत मित्रासमवेत पोहायला गेलेल्या समडोळी येथील शर्विल प्रशांत पाटील (वय 13) या शाळकरी मुलाचा पाण्याचा अंदाज न लागल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. 


शर्विल मित्रांसमवेत गुरुवारी सकाळी दहा ते साडेदहाच्या सुमारास पोहायला गेला होता. आठ दिवसांपासून नदीच्या पातळीत घट झाली होती. तो कडेला पोहायला शिकत होता. दोन दिवसांपूर्वी वारणेच्या पातळीत वाढ झाल्याने त्याला अंदाज आला नाही. त्याचे मित्र पोहून वर आले. शर्विल बाहेर आला नाही. तो बुडत असल्याचे पाहून काहींनी पाण्यात उडी मारून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्याला वाचवण्यात अपयश आले. पाण्यात पोहण्यास उडी मारताना पाण्यातील डोक्‍याला खडकाचा मार लागल्याने तो जखमी होऊन बुडाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. गांभीर्य ओळखून सांगलीच्या रेस्क्‍यू पथकास पाचारण करण्यात आले. दीड तासानंतर शर्विलचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. शर्विल समडोळी हायस्कूलमध्ये आठवीत शिकत होता. तो गुणवान व मनमिळावू होता. समडोळी व विद्यालयात हळहळ व्यक्त केली जात आहे. सांगली ग्रामीण पोलिस तपास करीत आहेत. 

विहिरीत पाण्यात बुडून मुलाचा मृत्यू 
विटा : विहिरीत पोहायला गेलेल्या दहा वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. चैतन्य सचिन वायदंडे (हजारेमळा, विटा) असे त्याचे नाव आहे. आज दुपारी साडेबारापूर्वी ही घटना घडली. ग्रामीण रुग्णालयातील डॉ. ए. डी. पाटील यांनी विटा पोलिसांत माहिती दिल. हजारे मळ्यातील चैतन्य घराशेजारील विहिरीत कोणाला न सांगता पोहण्यासाठी गेला होता. त्याला पोहता येत नसल्याने तो बुडाला. त्याला उपचारासाठी विटा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. 


पोहण्याचा आग्रह 
चैतन्यला अन्य मुलांप्रमाणे पोहता यावे, यासाठी वडिलांकडे शिकवण्याचा आग्रह करीत होता. चैतन्यचे वडील यंत्रमाग कामगार आहेत. रात्रपाळी सुरू झाल्यावर दिवसा पोहायला शिकवतो, असे त्यांनी सांगितले होते. मात्र तो आज घराशेजारच्या विहिरीत पोहायला गेला आणि बुडाला. 

संपादन : युवराज यादव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आशिष शेलार आघाडीवर

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT