Jalyukt Shivar Abhiyan In Satara 
पश्चिम महाराष्ट्र

पाणी पिकलंया... 'जलयुक्‍त'ची पहा अचाट किमया

विशाल पाटील

सातारा : गेल्या महायुती सरकारने राज्यात जलयुक्‍त शिवार अभियान राबविले. त्याचा फायदा जिल्ह्यास होऊन जिल्ह्यात तब्बल चार टीएमसी पाणी साठल्याचा अहवाल कृषी विभागाकडे आहे. त्यासाठी तब्बल 386 कोटींची कामे झाली आहेत. आता महाविकास आघाडी सरकार जलयुक्‍त शिवार अभियान नव्याने राबविणार का? याकडे दुष्काळग्रस्तांचे लक्ष लागले आहे. 

केवळ धरणे बांधून पाणी अडविण्याला प्राधान्य देण्याऐवजी गत महायुती सरकारने प्रत्येक गावात, डोंगर उतारांवर पाणी अडविण्यासाठी जलयुक्‍त शिवार अभियान 2015 मध्ये राबविली. "सकाळ माध्यम समूहा'ने राज्यभरातील तज्ज्ञांमार्फत "पाणी परिषद' घेतली होती. त्यातून हे अभियान राबविण्याची संकल्पना समोर आली. सातारा जिल्ह्यात 2015-16 वर्षांत 215 गावांची निवड केली होती. 2016-17 मध्ये पुन्हा 210 गावांची निवड झाली. 


दहा वर्षांपासून जास्त काळ पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकरवर अवलंबून असलेल्या गावांची यामध्ये निवड केली होती. त्या वेळी झालेल्या प्रभावी कामामुळे तत्कालीन जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्‌गल यांना हे अभियान राजस्थानमध्ये राबविण्यासाठी राज्य शासनाने पाठविले होते. श्री. मुद्‌गल, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्यासह जिल्हा प्रशासनाने अथक परिश्रम घेऊन वेळू तलाव जोड, किवळ, चांदक गुळूंब, कापशी, पिंपरी आदी ओढा जोड प्रकल्प अंमलात आणले. 

दुष्काळी भागातील माणगंगा, येरळा, वांगना, वसना, बाणगंगा आदी नद्यांचे पुनरुज्जीवकरण करण्याबरोबर पेशवेकालीन, ब्रिटिशकालीन, सध्याच्या बंधाऱ्यांचे खालीकरण, रुंदीकरणही करण्यात आले. या अभियानात कोरेगाव तालुक्‍यातील वेळे, जायगाव, खटाव तालुक्‍यातील भोसरे, माण तालुक्‍यातील बिदाल, टाकेवाडी, भांडवली आदी गावांनीही राज्यात चमकदार कामगिरी केली. 

दुष्काळी तालुक्‍यांसाठी जलयुक्‍त शिवार अभियान, विविध स्पर्धांमुळे वरदानच मिळाले. मात्र, नंतरच्या काळात महायुती सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्याने हे अभियानही मागे पडत गेले. राज्यात आता शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेसच्या महाविकास आघाडीचे सरकार आले असून, ते हे अभियान राबविणार, की नव्याने त्यात बदल करणार, याकडे दुष्काळग्रस्तांचे लक्ष लागले आहे. 


ही झाली महत्त्वाची कामे... 

किवळ ओढा जोड प्रकल्प 
पिंपरी ओढा जोड प्रकल्प 
कापशी ओढा जोड प्रकल्प 
चांदक गुळूंब ओढा जोड प्रकल्प 
वेळू पाझर तलाव जोड प्रकल्प 
नदी पुनरुज्जीवन प्रकल्प 
वावर तिथे ठिबकची पावर 
कम्पार्टमेंट बांधावर तूर लागवड 


"जलयुक्‍त'चा आढावा... 

कामे 17942 
एकूण गावे 725 
खर्च (कोटी) 386
पाणीसाठा (टीसीएम) 114393 
संरक्षित सिंचन क्षेत्र (हेक्‍टर) 89337
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT