Sawantwadi-Belgaum Highway Amboli Tourism esakal
पश्चिम महाराष्ट्र

आंबोलीची सफर ठरली अखेरची! महामार्गावर दोन अपघातांत चार तरुण ठार; मोमीनचं लग्न ठरलं, साखरपुडा झाला अन्..

सकाळ डिजिटल टीम

मृत मोमीन हा रिक्षातून विद्यार्थी ने-आण करण्याचे काम करीत होता. त्याचे लग्न ठरले होते. साखरपुडाही झाला होता. लग्नाची तारीख निश्चित केली जात असतानाच काळाने त्याच्यावर घाला घातला.

चंदगड, सावंतवाडी : सावंतवाडी-बेळगाव महामार्गावर (Sawantwadi-Belgaum Highway) झालेल्या दोन अपघातांत बेळगाव जिल्हातील चौघा तरुणांचा मृत्यू झाला. हे सर्व आंबोली येथे पर्यटनासाठी (Amboli Tourism) निघाले होते, मात्र त्यांची ही सफर अखेरची ठरली. पहिल्या अपघातात हिंडगाव फाट्यानजीक मोटार व दुचाकी (Road Accident) यांच्यात समोरासमोर धडक बसून दोघे तरुण ठार झाले; तर दुसऱ्या घटनेत आंबोली-नांगरतास येथे दुचाकीची पिकअपला धडक बसल्याने झालेल्या अपघातात गोकाक येथील युवक जागीच ठार झाला, तर दुसऱ्या तरुणाचा उपचार घेतेवेळी मृत्यू झाला.

सविस्तर वृत्त असे, बेळगाव- सावंतवाडी मार्गावर हिंडगाव फाट्यानजीक मालवाहू मोटार व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक झाली. यात एकजण जागीच ठार झाला. दुसऱ्याला दवाखान्यात नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. मलिक खतालसाहब मुजावर (रा. सांबरे मुदगा, ता. जि. बेळगाव) व दौलत खताल मोमीन (रा. पंत बाळेकुंद्री, ता. जि. बेळगाव) अशी त्यांची नावे आहेत. दुपारी सव्वादोनच्या सुमारास हा अपघात झाला.

मृत मुजावर व मोमीन हे काल दुचाकीवरून आंबोलीला चालले होते. मुजावर हा दुचाकी चालवत होता. भरधाव वेगाने ते चालले होते. हिंडगाव फाट्यानजीक सचिन कडते यांच्या शेताजवळील वळणावर समोरून मालवाहू मोटार (एमएच ११, एएल ३०९) येत होती. अचानक समोर आलेली मोटार आणि वळण यामुळे त्यांचा गाडीवरील ताबा सुटला. भरधाव वेगाने दुचाकी मोटारीवर चालकाच्या बाजूला जाऊन आदळली. ही धडक इतकी जोरात होती की मोटारीचे बॉनेट चेपले गेले.

मुजावर मोटारीवर आदळून त्याच्या डोकीचा चेंदामेंदा झाला. तो जागीच ठार झाला. मोमीन हवेत उडून दूरवर फेकला गेला. स्थानिक नागरिकांनी तातडीने त्याला येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यासाठी वाहनात घातले, मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला. काल ईद झाल्याने आज मौज करण्यासाठी ते आंबोलीला चालले होते. मात्र, भरधाव वेगाचे ते बळी ठरले. या प्रकरणी मृत मुजावर याने बेफिकीरीने वाहन चालवून स्वतःच्या व मोमीन याच्या मृत्यूस तसेच मोटारीच्या नुकसानीस कारणीभूत झाल्याबद्दल त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस हेड कॉन्स्टेबल देसाई तपास करीत आहेत.

दुसऱ्या घटनेत सावंतवाडी-बेळगाव महामार्गावर आंबोली-नांगरतास येथे दुचाकीची पिकअपला धडक बसल्याने झालेल्या अपघातात गोकाक (जि. बेळगाव) येथील युवक जागीच ठार झाला, तर एक गंभीर जखमी झाला. सादिक इम्तियाज मुल्ला (वय १९) असे मृताचे नाव आहे. सायंकाळी चारच्या सुमारास अपघात झाला. सादिक व त्याचे मित्र आंबोली येथे वर्षा पर्यटनासाठी येत होते, मात्र त्यांची ही सफर अखेरची ठरली.

याबाबत अधिक माहिती अशी की : गोकाक येथून सादिक व त्याचे मित्र आंबोली येथे वर्षा पर्यटनासाठी येत होते. सादिक दुचाकी (केए ४९, क्यू ४८२९) चालवत होता. त्याचा मित्र तय्यब सुलतानसाहब ऊसपघाला मागे बसला होता. दोघे आंबोली नांगरतास फाटा येथे आले असता त्यांच्या दुचाकीची समोरून येणाऱ्या पिकअपला जोरदार धडक बसली. त्यात सादिकच्या डोक्याला जबर मार बसला. त्याचा जागीच मृत्यू झाला, तर तय्यब गंभीर जखमी झाला. त्याला बेळगाव येथील केलई रुग्णालयामध्ये हलविण्यात आले आहे. आंबोलीचे हेड कॉन्स्टेबल आबा पिळणकर, कॉन्स्टेबल मनीष शिंदे तपास करत आहेत.

लग्नापूर्वीच मृत्यूने गाठले...

मृत मोमीन हा रिक्षातून विद्यार्थी ने-आण करण्याचे काम करीत होता. त्याचे लग्न ठरले होते. साखरपुडाही झाला होता. लग्नाची तारीख निश्चित केली जात असतानाच काळाने त्याच्यावर घाला घातला. तर मृत मुजावर याचे मुदगा येथे दुचाकीचे गॅरेज होते. तोही अविवाहित होता. कष्ट करून चरितार्थ चालवणाऱ्या दोन उमद्या तरुणांचा दुःखदायी मृत्यू झाला. ते दोघे मित्र होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT