स्वातंत्र्य चळवळीला लागणारा निधी गोळा करण्यासाठी महात्मा गांधी देशभर फिरत होते.
खडकलाट : आज २ ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५२ वी जयंती साजरी होत आहे. महात्मा गाधींनी १९३४ साली नवलिहाळ (ता. चिक्कोडी) साली अक्काचंद पद्मचंद गुजर यांच्या घरात दोन दिवसासाठी वास्तव्य केले होते. त्या घरात गांधींचे स्मारक व्हावे, अशी मागणी मेहता कुटुंबीयांसह नवलिहाळ ग्रामस्थ करीत आहेत. मात्र त्याचा शासनाला विसर पडला आहे.
स्वातंत्र्य चळवळीला लागणारा निधी गोळा करण्यासाठी महात्मा गांधी देशभर फिरत होते. त्यावेळी ७ व ८ मार्च १९३४ या दोन दिवसांसाठी नवलिहाळात वास्तव्यास होते. त्यांनी वास्तव्य केलेल्या ऐतिहासिक घराची दयनीय अवस्था झाली आहे. नवलिहाळ वास्तव्याप्रसंगी नवलिहाळ ग्रामस्थांनी चळवळीसाठी गांधींना १९६५ रुपयांचा निधी दिला. मेहता कुटूंबीय हे घर महात्मा गांधी स्मारकासाठी शासनाला देऊ इच्छितात, तरीही स्मारक बनविण्यासाठी शासनाची उदासीनता आहे.
अक्काचंद गुजर नवलिहाळ गावातील मोठे प्रतिष्ठित व्यक्ती होते. त्यांना चार मुली होत्या. या मुली गांधींच्या चळवळीमुळे प्रेरित होऊन आंदोलनात सहभागी झाल्या. वास्तव्य केलेले हे घर १९५० पासून रिकामेच आहे. सहा वर्षांपूर्वी गुजर यांचे वारसदार रेखा मेहता, राहुल मेहता व प्रशांत मेहता यांची तहसीलदारांनी भेट घेऊन गांधींच्या वास्तव्यासह वास्तूंची माहिती संकलित केली आहे. मात्र आजतागायत स्मारक बनविण्याच्या दृष्टीने दुर्लक्ष झाले आहे. २ ऑक्टोबर महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी त्यांचे स्मरण होते. मात्र इतरवेळी विसर पडताना दिसत आहे.
पुढील पिढीसाठी स्मारक गरजेचे
राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नवलिहाळमध्ये आम्ही ज्ञानदानाचे काम करतो, ही अभिमानाची गोष्ट आहे. पुढील पिढीला महात्मा गांधींच्या कार्याची माहिती व्हावी, यासाठी येथे स्मारक होणे गरजेचे आहे, असे मत महात्मा गांधी यांच्या दौऱ्याबाबत पुस्तक लिहिणारे शिक्षक व्ही. के. धुमाळ यांनी व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.