full response in Sangli against the Agriculture Bill 
पश्चिम महाराष्ट्र

कृषि विधेयकाच्या विरोधात बंदला सांगलीत उत्स्फूर्त प्रतिसाद

अजित झळके

सांगली : केंद्र शासनाच्या कृषी विधेयकाच्या विरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बंदला आज चांगला प्रतिसाद मिळतो आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे. सांगली आणि मिरज या दोन प्रमुख शहरांमधील पेठांमध्ये बहुतांशी दुकाने बंद ठेवून व्यापाऱ्यांनीही या बंदला पाठिंबा दर्शवला आहे.  


दरम्यान सकाळच्या टप्प्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी सकाळी स्टेशन चौकातून फेरी काढण्याची तयारी सुरू झाली आहे. ही फेरी सांगलीतील सर्व पेठांतून फिरून व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांना पाठिंबा देण्याचे आवाहन करेल.

केंद्र शासनाने लागू केलेल्या कृषी विधेयकाच्या विरोधात दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. पंजाब हरियाणा सह उत्तर भारतातील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. त्या आंदोलनाची दडपशाही सुरू असल्याचा निषेध करत देशभरातील शेतकऱ्यांनी आज भारत बंदची हाक दिली आहे.  काही शेतकरी संघटनांचा अपवाद वगळता अनेकांनी या बंदमध्ये सहभागी होण्याचे जाहीर केले आहे.  त्यानुसार जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सकाळपासूनच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून बहुतांश ठिकाणी बाजारपेठा पूर्ण बंद ठेवण्यात आले आहेत.

 सांगली, मिरज शहरातील व्यापारी संघटनांनी बंद च्या पाठीशी राहणार की त्याला विरोध करणार अशी कोणतीही ठोस भूमिका घेतली नसली तरी परिस्थिती पाहता दुकाने दुपारपर्यंत बंद ठेवण्याबाबत सकारात्मकता दर्शविली आहे.  त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने आज सकाळी सुरू झाली नाहीत. व्यापारी पैठणमध्ये तूर्त शुकशुकाट आहे.  काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस स्वाभिमानी शेतकरी संघटना शिवसेना या सर्व पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सकाळी स्टेशन चौकातून फेरी काढून या बंदला पाठिंबा देण्याचे आवाहन करण्याचे ठरवले आहे. त्याचे नियोजन सुरू आहे.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांचा ३१६५१ मतांनी विजयी

Shweta Mahale Won Chikhli Assembly Election 2024: चिखली विधानसभेत काँग्रेस विरुद्धच्या थरारक सामन्यात भाजपच्या श्वेता महाले विजयी!

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Tanaji Sawant won Tuljapur Assembly Election Result 2024 : राणाजगजितसिंह पाटील यांच्या पदरी 'जीत', तुळजापूरमध्ये कमळ फुलले

Miraj Assembly Election 2024 Results : मिरज मतदारसंघात सुरेश खाडेंनी ठाकरे गटाच्या तानाजी सातपुतेंवर 44,706 मतांच्या फरकाने केली मात

SCROLL FOR NEXT