Fake Currency Case Gokak Police esakal
पश्चिम महाराष्ट्र

Fake Currency : बनावट नोटाप्रकरणी सहाजणांच्या टोळीला अटक, गोकाक पोलिसांची कारवाई; प्रिंटर, संगणकासह मुद्देमाल जप्त

याप्रकरणी प्रमुख आरोपी अन्वर मुना यडहळी (वय २७, रा. आरभावी) याच्या घरात प्रिंटर, संगणक, सीपीआय प्रिंटर, स्कॅनिंग बोर्ड, रंग, प्रिंटिंग पेपर, कटिंग मशीन जप्त करण्यात आले.

सकाळ डिजिटल टीम

मोटारीत ३०,५०० किमतीच्या १०० रुपयांच्या असली ३०५ नोटा आढळून आल्या. दर्शनी मूल्य ५०० रुपयांच्या ६७९२ नोटा आढळून आल्या.

गोकाक : बनावट नोट (Fake Notes) देऊन दुप्पट करून देतो म्हणून जनतेला फसविणाऱ्या सहाजणांच्या टोळीस मुद्देमालासह अटक केली. येथील गोकाक शहर पोलिसांनी (Gokak City Police) ही कारवाई केली. पोलिसांनी बनावट नोटांसह प्रिंटर, संगणक, सीपीआय प्रिंटर, स्कॅनिंग बोर्ड, रंग, प्रिंटिंग पेपर, कटिंग मशीन असे साहित्यही जप्त केले.

याप्रकरणी प्रमुख आरोपी अन्वर मुना यडहळी (वय २७, रा. आरभावी) याच्या घरात प्रिंटर, संगणक, सीपीआय प्रिंटर, स्कॅनिंग बोर्ड, रंग, प्रिंटिंग पेपर, कटिंग मशीन जप्त करण्यात आले. रोख रक्कम, मोटार व अन्य साहित्यासह एकूण पाच लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी सद्दाम मुसा यडहळी (वय २७), रवी चन्नप्पा ब्यागडी (वय २७, दोघेही रा. महालिंगपूर), दुंडाप्पा महादेव एनशनवी (वय २७), मल्लाप्पा अलप्पा कुंभाळी (वय २९), विठ्ठल हनुमंत होसकोटे (वय २९, पाचही जण रा. महालिंगपूर, ता. रबकवी-बनहट्टी, जि. बागलकोट) यांना अटक करुन न्यायालयात हजर करण्यात आले. यासंबंधी गोकाक शहर पोलिसांतून मिळालेल्या माहितीनुसार गोकाक परिसरात नोटा दुप्पट करून देतो म्हणून सांगून जनतेला फसविणारी एक टोळी असल्याची माहिती मिळाली.

त्याचा छडा लावण्यासाठी जिल्हा पोलिस प्रमुख भीमाशंकर गुळेद यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गोपाळ राठोड यांच्या नेतृत्वाखाली गोकाक ग्रामीण उपनिरीक्षक किरण मोहिते, गोकाक शहर उपनिरीक्षक के. बी. वालीकर, अंकलगी उपनिरीक्षक यमनाप्पा मांग यांच्यासह अंकलगी, गोकाक शहर व गोकाक ग्रामीण पोलिसांचे एक पथक नेमले होते. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार २९ जूनला पहाटे साडेचार वाजता गोकाक नाका नंबर एकवर अरभावीहून गोकाकमार्गे बेळगावकडे जाणारी मोटारीची कसून तपासणी केली. मोटारीत ३०,५०० किमतीच्या १०० रुपयांच्या असली ३०५ नोटा आढळून आल्या. दर्शनी मूल्य ५०० रुपयांच्या ६७९२ नोटा आढळून आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्राच्या मतमोजणीला सुरुवात, पहिला कल आला हाती...

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: राज्यात मतमोजणीला सुरवात

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT