सोलापूर : अमृत योजनेत समाविष्ट असलेल्या शहरांचे विकास आराखडे तयार करण्यासाठी भौगोलिक माहिती प्रणाली (जिऑग्राफिकल इन्फर्मेशन सिस्टिम-जीआयएस) वापरण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. या पद्धतीमुळे आराखडे जलद तयार होण्यास मदत होणार आहे. महापालिका, नगरपालिका व नगर परिषदांसाठी ही योजना बंधनकारक करण्यात आली आहे.
सध्या पारंपरिक पद्धतीने आराखडे तयार केले जातात. ते तयार व्हायला काही वेळा महिनोन् महिने तर काही वेळा वर्षाचाही कालावधी लागतो. नंतर तो मंजुरीसाठी पाठविला जातो. त्यास मंजुरी वेळेत मिळाली तर ठीक, अन्यथा विकास आराखड्यानुसार कामे होण्यासही विलंब होतो. ही पद्धत वापरल्यामुळे नागरी जमिनींचे व्यवस्थापन, जागांच्या विकासाचे व्यवस्थापन, प्रकल्प व्यवस्थापन, नागरी व्यवस्थापन, त्याचप्रमाणे पाणी, ड्रेनेज आणि रस्त्याचे आराखडे तयार करण्यास मदत होणार आहे.
"जीआयएस' प्रणालीनुसार तयार करण्यात आलेल्या नकाशांचा वापर इस्पितळ, शाळा, खेळाचे मैदान, बगीचा, अग्निशमन केंद्र, नगर सभागृह, या सुविधा दाखविणे व आवश्यकतेनुसार सुधारणा करणे यासाठी होऊ शकणार आहे. या पद्धतीने आराखडे केल्यामुळे जनतेलाही ही माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे आगामी आराखडे या पद्धतीचा वापर करून करावेत, अशा सूचना शासनाने दिल्या आहेत.
सोलापूर शहराचा पुढील आराखडा 2024 ते 2044 या कालावधीसाठी असणार आहे. त्यासाठी "जीआयएस' प्रणालीचा वापर करण्यात येईल.
- लक्ष्मण चलवादी, सहायक संचालक,
नगररचना, सोलापूर महापालिका
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.