कसबा तारळे ( कोल्हापूर ) - येथे गावाबाहेर असलेल्या गजानन महाराज मंदिरात येथील एका अल्पवयीन तरुणीचा वाढदिवसालाच मंदिरातील घंटेला ओढणीने गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. मित्र व मैत्रिणीसमवेत वाढदिवस साजरा करण्यास गेलेल्या या तरुणीच्या मृत्यूबाबत संशयाचे वातावरण तयार झाले असून दुपारच्या दरम्यान घडलेल्या या घटनेचे वृत्त समाज माध्यमातून वाऱ्यासारखे पसरल्याने ही आत्महत्या की घातपात या चर्चेने परिसर ढवळून गेला.
दरम्यान,जिल्हा पोलिस प्रशासनानेही या घटनेची गंभीर दखल घेतली असून जिल्हा अतिरिक्त पोलिस प्रमुख तिरुपती काकडे, पोलिस उपअधिक्षक प्रशांत अमृतकर, राधानगरीचे पोलिस निरीक्षक उदय डुबल यांनी रात्री घटना स्थळाला भेट देत तातडीने तपासास सुरूवात केली.
हेही वाचा - धक्कादायक ! सुट्टीसाठी चालकाने केला मालकाचा खून
याबाबत घटनास्थळ आणि पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी : येथील कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीच्या शास्त्र शाखेत शिकत असलेल्या तरूणीचा आज वाढदिवस होता. तो साजरा करण्यासाठी ती येथील गजानन महाराज मंदिरात एका
मैत्रिणीसह गेली होती. तेथे स्थानिकचे चार व बाहेर गावचे दोन असे सहा मित्रही आले होते. वाढदिवस झाल्यानंतर मैत्रिणीला तिने घरी जाण्यास सांगितले व ते तरुणही तेथून निघाले.
दरम्यान, गावातील काही शेतकरी आणि महिला मंदिरात गेल्या असता दुपारी अडीचच्या सुमारास त्यांना मंदिरातील घंटीला गळफास घेतलेल्या अवस्थेत या तरुणीचा मृतदेह दिसला. ही बातमी लगेचच गावात समजल्याने तिचे काही नातेवाईक तेथे आले. त्यांनी मृतदेह काढून प्रथम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात व तेथून तो घरी नेला. राधानगरी पोलिसांना घटनेची
माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी सोळांकुर येथील ग्रामीण रुग्णालयात नेला.परंतु नातेवाईकांनी इनकॅमेरा उत्तरीय तपासणीची मागणी केल्याने तो कोल्हापूरातील सीपीआरमध्ये नेण्यात आला.
संबंधित तरुणांची चौकशी
मृत तरुणीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तेथे उपस्थित असलेल्या तरुणांपैकी काहीजणांना आणि मैत्रिणीस वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी बोलावून त्यांच्याकडे प्राथमिक चौकशी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.