Gokak Mahalaxmi Bank Scam esakal
पश्चिम महाराष्ट्र

'या' महालक्ष्मी बँकेत कर्मचाऱ्यांनी केला तब्बल 75 कोटींचा घोटाळा; 82 कोटींचे कर्ज वितरण केले अन्..

सकाळ डिजिटल टीम

गोकाक महालक्ष्मी सहकारी सोसायटीची सन १९७६ मध्ये स्थापना झाली आहे. ४० वर्षांपूर्वी सोसायटीचे बॅंकेत परिवर्तन करण्यात आले आहे.

गोकाक : जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील अग्रेसर म्हणून ख्याती मिळवलेल्या गोकाक महालक्ष्मी बँकेत (Gokak Mahalaxmi Bank) कर्मचाऱ्यांनी संगनमताने ७५ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचे उघडकीस आल्याने शहरात खळबळ माजली आहे.

या संबंधी गोकाक शहर पोलिसातून (Gokak City Police) मिळालेल्या माहितीनुसार, बँकेचे उपाध्यक्ष जितू मांगळेकर यांनी पोलिसात बँकेचे व्यवस्थापक सिद्दाप्पा सदाशिव पवार, कर्मचारी विश्वनाथ अशोक बागडे, दयानंद शिवानंद उप्पीन, संभाजी मल्लाप्पा घोरपडे, सागर हणमंत सबकाळे यांच्या विरोधात बँकेत घोटाळा केल्याची तक्रार दिली आहे.

या पाच जणांनी १ जानेवारी २०२१ ते २० एप्रिल २०२४ दरम्यान आपले नातेवाईक संजना सागर सबकाळे, मलव्वा हणमंत सबकाळे, गौरव्वा बाळाप्पा हवालदार, चंद्रव्वा हवालदार, मायव्वा मायाप्पा जाधव, परसाप्पा चलाप्पा मालोजी, राधा परसाप्पा मालोजी, संदीप बसवराज मराठे, किरण सखाराम सुपली आणि नातेवाइकांच्या नावावर असलेले सहा कोटी ९७ लाख ३० हजार बँकेत ठेवी होत्या.

बेकायदेशीररित्या ८१ कोटी ८३ लाख ६७ हजार रुपयांचे कर्ज ठेवी ठेवलेल्यांनाच दिले. या व्यवहारात बँकेचे ७४ कोटी ८६ लाख ३६ हजार ९६४ रुपयांची फसवणूक केली असल्याची फिर्याद मांगळेकर यांनी दिली. या नातेवाइकांनी घोटाळ्याच्या रकमेतून शहर व परिसरात भूखंड खरेदी केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. या घटनेची गोकाक शहर पोलिसात नोंद असून उपाधीक्षक दादापीर मुल्ला, पोलिस निरीक्षक गोपाळ राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक के. बी. वालीकर अधिक तपास करीत आहेत.

दरम्यान, मांगळेकर यांनी गृह कर्ज, वाहन कर्ज व अन्य कर्जासंबंधीचे प्रकरणे बँकेच्या संचालक मंडळाकडे मंजुरीस येतात. पिग्मी कर्ज, मुदत ठेवीवरील कर्ज प्रकरणे ही बँकेच्या रोजच्याच व्यवहारातील भाग असतात. या व्यवहारातून हा घोटाळा झालेला आहे. संगणकातील पासवर्डचा उपयोग करून घोटाळा केलेला आहे, असे तक्रारीत नमूद केले आहे.

बँकेत चार वर्षापासून व्यवहाराचे आधुनिकिकरण सुरू आहे. संगणकासाठी वापरण्यात येणारे पासवर्ड विश्वासू कर्मचारी सागर हणमंत सबकाळे यांच्याकडे दिला होता. पाच लाखांपर्यंतच्या मुदत ठेवीवर विम्याचे संरक्षण आहे. त्यामुळे ठेवीदारांनी घाबरण्याचे कारण नाही. यासाठी सभासद व ठेवीदाराची लवकरच बैठक घेण्यात येत असल्याचे बँकेने सांगितले.

सात ठिकाणी एटीएमसेवा

गोकाक महालक्ष्मी सहकारी सोसायटीची सन १९७६ मध्ये स्थापना झाली आहे. ४० वर्षांपूर्वी सोसायटीचे बॅंकेत परिवर्तन करण्यात आले आहे. बॅंकेच्या गोकाक, बेळगाव, निपाणी, चिक्कोडी, घटप्रभा व गोकाक उपनगरात शाखा आहेत. याचबरोबर सात ठिकाणी बँकेने एटीएम सेवा सुरू केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RG Kar Doctors Strike Down : कोलकात्यातील डॉक्टरांचा संप अखेर मागे! तरीही आरजी कर कॉलेजच्या डॉक्टरांनी सरकारला दिला इशारा

IND vs BAN: विराट कोहलीने सर्वांसमोर कुलदीप यादवला मैदानात खेचत नेलं, ऋषभ पंतनेही दिली साथ, पाहा Video

Donald Trump Third Attack: ट्रम्प यांच्यावर पुन्हा जीवघेणा हल्ला? अॅरिझोना इथल्या निवडणूक रॅलीत नेमकं काय घडलं?

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

SCROLL FOR NEXT