Gokul Dudh Sangh 
पश्चिम महाराष्ट्र

Gokul Dudh Sangh : आतमधील ठरावधारक सभासद निम्म्याहून अधिक बोगस; शौमिका महाडिक यांचा आरोप

रवींद्र देशमुख

कोल्हापूर - आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी गाजत असलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) 61व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (Gokul Dudh Sangh) गोंधळ पाहायला मिळाला. सभेपूर्वीच बॅरिकेडस तोडून आत जाण्याचा प्रयत्न महाडिक गटाच्या सभासदांकडून करण्यात आला. सर्वसाधारण सबेतील गोंधळावर संचालक शौमिका महाडिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

वार्षिक सभेत संचालिका शौमिका महाडिक (Shoumika Mahadik) यांनी उपस्थित केलेले प्रश्‍न व त्याची सभेत मागितलेली उत्तरे यावरून राजकीय ईर्ष्या पाहायला मिळणार हे स्पष्टच होतं. संघाची सभा आज संघाच्या मालकीच्या पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील पशुखाद्य कारखान्यात सुरू होण्यापूर्वी गोंधळ पाहायला मिळाला.

यावेळी शौमिका महाडिक म्हणाल्या की, सभेत बसलेले सभासद आहेत ते निम्म्याहून अधिक बोगस आहे. ते झेरॉक्स कॉपी घेऊन आलेले आहेत. मला असं सांगण्यात आलं की, इथेच राहून झेरॉक्स कॉपी वाटण्यात आली आहे. त्यामुळे आत असलेले ठरावधारक बोगस आहे. बाहेर दोन किलोमीटर दूरवर सभासद आहे. यापूर्वी असं कधीही झालं नव्हतं. बॅरीगेट लावण्याची कधीही पद्धत नव्हती. याचा अर्थ खरे सभासद येथे येऊन प्रश्न विचारायला नको होते, असा आरोप शौमिका महाडिक यांनी केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Visarjan 2024: गणेश विसर्जन मिरवणुकीत साध्या वेशातील पोलिस तैनात, गृह खात्याने का घेतला निर्णय?

Mumbai, Pune Weather Updates: गणेश विसर्जन मिरवणुकीत पावसाचा अडथळा? मुंबई, पुण्यात काय परिस्थिती?

Mahayuti: महाराष्ट्र विधानसभा जिंकण्याचा काय आहे महायुतीचा प्लॅन? फॉर्मुला विषयी काय झाली चर्चा? वाचा बातमी एका क्लिकवर

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

SCROLL FOR NEXT