सांगली : केंद्राने लॉकडाउन सुरू झाल्यापासून म्हणजे एप्रिलपासून घरगुती गॅस ग्राहकांच्या खात्यात अनुदानाची रक्कमच जमा केली नाही. गॅस कंपन्यांच्या संकेतस्थळावरही कोणतेही स्पष्टीकरण दिसत नाही. वर्षभर गॅसची दरवाढ होत आहे. या महिन्यात एक फेब्रुवारीला 50 रुपये आणि 14 फेब्रुवारीला 25 रुपये इतकी कंबर तोड दरवाढ झाली. आजवरच्या इतिहासात महिन्यात झालेली ही विक्रमी दरवाढ आहे.
गॅस ग्राहकांच्या खात्यात अनुदान शासनाने कोणत्याही घोषणेविनाच बंद केल्याचे सध्याचे चित्र आहे. सांगली जिल्ह्यात भारत गॅस, इंडियन ऑइल तसेच हिंदुस्तान पेट्रोलियम या तिन्ही कंपन्यांच्या 23 एजन्सी आहेत. त्याचे पाच लाखांवर गॅस ग्राहक आहेत. अनुदानीत 12 सिलिंडरसाठी महिन्याकाठी दोनशे अडीचशे रुपये अनुदान मिळत होते. सन 2015 पासून या अनुदानात हळूहळू कपात होत गेली. सिलिंडरच्या कमी जास्त होणाऱ्या किंमतीनुसार ही रक्कम ठरते. मात्र, एप्रिल 2020 पासून गॅस अनुदानाची रक्कम ग्राहकांच्या बॅंक खात्यात जमा झालेली नाही.
हेही वाचा - सांगलीत आमराईबाबत 23 फेब्रुवारीला बैठक ; नेमका प्लॅन सादर करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना -
सांगलीत आजची घरगुती सिलिंडरची किंमत 772.50 रुपये आहे. गेल्या एक फेब्रुवारीला ती 722.50 रुपये होती. एप्रिलपासून अनुदान पुर्णतः बंद झाले आहे. त्यामुळे आता अनुदानीत आणि विनाअनुदानीत असा फरकच राहिलेला नाही. त्याची सुरवात गेल्या मे महिन्यात झाली. अनुदानीत आणि विनाअनुदानीत सिलिंडरची किंमत एकाच पातळीवर आली. गॅस कंपन्यांनीही आपल्या वेबसाइटवरून अनुदानीत सिलिंडरची माहिती देणे बंद केले आहे. विनाअनुदानीत सिलेंडरची किंमत घटवितानाच अनुदानित सिलेंडरची किंमत मात्र सरकारने वाढवली आहे.
"सिलिंडर पावणेआठशेवर गेला. सबसिडीही बंद झाली ते कळलेच नाही. बॅंकेत चौकशी केली तर ती वरूनच बंद झाली असं सांगतात. इकडे मात्र म्हणेल तेवढे पैसे द्यावे लागतात."
- कलावती झेंडे, शामरावनगर
"गॅस सबसिडीच बंद झाल्याने अनुदानीत आणि विनाअनुदानीत असा फरक राहिलेला नाही. ग्राहकांना पटवून देणे अवघड जातेय. उज्वला योजने अंतर्गत मोफत गॅस जोडण्या देण्यात आल्या होत्या. मात्र त्याची रक्कम सिलिंडर अनुदानातून कपात झाली आहे."
- अशोक पाटील गणपती जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी सोसायटी
संपादन - स्नेहल कदम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.