बेळगाव Sakal
पश्चिम महाराष्ट्र

गुलबर्गा महापौर निवडणूक जाहीर; बेळगावाची कधी? आरक्षणाचा घोळच

मल्लिकार्जुन मुगळी

बेळगाव : गुलबर्गा (Gulbarga)महापालिकेची महापौर व उपमहापौर निवडणूक २० नोव्हेंबर रोजी होणार आहे. गुलबर्गा महापालिके सोबतच बेळगाव व हुबळी-धारवाड (Belgaum,Hubli,Dharwad) महापालिकेची निवडणूक झाली आहे. पण या दोन महापालिकांच्या महापौर व उपमहापौर निवडणूकीबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. ११ फेब्रुवारी २०२१ रोजी नगरविकास खात्याने जाहीर केलेल्या आरक्षणानुसाच गुलबर्गा महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक होत आहे. पण बेळगाव महापालिकेला मात्र ११ फेब्रुवारी रोजीच्या आरक्षणाबाबत स्पष्टीकरण हवे आहे.

गुलबर्गा महापालिका आयुक्ताना ११ फेब्रुवारीच्या आरक्षणानुसार महापौर व उपमहापौर निवडणूक घेण्याचा प्रस्ताव २१ ऑक्टोबर रोजी गुलबर्गा प्रादेशिक आयुक्ताना पाठविला होता. त्यानुसार गुलबर्गा प्रादेशिक आयुक्तांनी तेथील महापौर व उपमहापौर निवडणूक २० नोव्हेंबर रोजी घेण्याचे निश्‍चित केले आहे. बेळगाव महापालिका आयुक्तांनी महापौर निवडणूकीबाबतचा प्रस्तावच अद्याप बेळगावच्या प्रादेशिक आयुक्तांकडे पाठविलेला नाही. त्यामुळे प्रादेशिक आयुक्तांनी महापौर निवडणूकीचे वेळापत्रक जाहीर केलेले नाही.

राज्यातील दहा महापालिकांच्या महापौर व उपमहापौरपदाचे आरक्षण नगरविकास खात्याने ११ फेब्रुवारी रोजीच जाहीर केले आहे.

बेळगाव व हुबळी-धारवाड या दोन्ही महापालिकांची महापौर-उपमहापौर निवडणूक बेळगावचे प्रादेशिक आयुक्त आमलान बिश्‍वास यांच्या अध्यक्षतेखालीच होणार आहे. दोन्ही महापालिका आयुक्तांकडून तसा प्रस्ताव बिश्‍वास यांच्याकडे गेल्यानंतरच निवडणूकीची तारीख निश्‍चित केली जाणार आहे. पण बिश्‍वास यांच्याकडे अद्याप प्रस्तावच पाठविण्यात आलेला नाही अशी माहिती मिळाली आहे.

राज्यातील दहा महापालिकांच्या महापौर व उपमहापौरपदाचे आरक्षण नगरविकास खात्याने ११ फेब्रुवारी रोजीच जाहीर केले आहे. त्यापैकी बेळगाव, हुबळी-धारवाड व गुलबर्गा या तीन महापालिकांची निवडणूक ३ सप्टेबर रोजी झाली. या निवडणूकीचा निकाल ६ सप्टेबर रोजी जाहीर झाला. निकाल जाहीर होवून दोन महिने लोटले तरी बेळगाव व हुबळी-धारवडच्या महापौर-उपमहापौर निवडणूकीबाबतची अनिश्‍चितता कायम आहे.

आरक्षणबाबत नगरविकास खात्याकडून स्पष्टीकरण न आल्यामुळेच निवडणूक झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. पण ११ फेब्रुवारी रोजी जाहीर झालेल्या आरक्षणानुसार गुलबर्गा महापालिकेच्या महापौर-उपमहापौरपदाची निवडणूक होत असेल तर मग बेळगाव व हुबळी-धारवाड महापालिकेची निवडणूक त्या आरक्षणानुसार का घेतली जात नाही? असा सवाल नगरसेवकांकडून उपस्थित केला जात आहे.

बेळगावचे महापौरपद सामान्य प्रवर्गासाठी तर उपमहापौरपद सामान्य महिला या प्रवर्गासाठी राखीव आहे. निवडणूकीत भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळाल्यामुळे पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी या दोन्ही पदासाठी उमेदवारांची चाचपणी सुरू केली होती, काही नावे निश्‍चितही केली होती. पण अचानक महापालिकेला आरक्षणावरून संभ्रम निर्माण झाला. त्याबाबत नगरविकास खात्याला पत्र पाठवून स्पष्टीकरण विचारण्यात आले. ११ फेब्रुवारी रोजी जाहीर झालेल्या आरक्षणानुसार महापौर व उपमहापौर निवडणूक घ्यावी का? याबाबत महापालिकेला स्पष्टीकरण हवे आहे. पण ते स्पष्टीकरण अद्याप न आल्याचे महापालिकेचे म्हणने आहे.

एच. बी. पीरजादे- सहाय्यक कौन्सिल सेक्रेटरी- महापौर-उपमहापौर पदाच्या आरक्षणाबाबत नगरविकास खात्याकडून स्पष्टीकरण आल्यानंतरच प्रादेशिक आयुक्तांना पत्र पाठवून महापौर-उपमहापौर निवडणूक घेण्याची शिफारस केली जाणार आहे. तोवर निवडणूक वेळापत्रक जाहीर होणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT