Gutkha Mawa Sales Hot Spot In Kolhapur Martahi News 
पश्चिम महाराष्ट्र

सॅकमधून केला जातो 'हा' काळा धंदा....

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर :  वेळ सकाळी साडेअकराची. उद्यमनगर परिसरातील पानपट्टीला भेट देऊन ‘मावा मिळेल का?’ विचारले तर हाफ १५ रुपये आणि फुल्ल २० रुपये असे सांगितले. खिशातून पैसे काढायचा अवकाश, पानपट्टी चालकाने पुडी हातावर ठेवली. सायबर चौकातील सिग्नलपासून फुटपाथवर छोट्या गाडीवर पानपट्टी आहे.

पान मसाल्यासह अन्य पुड्या येथे लटकताना दिसतील. गुटख्याची पुडी स्टीलच्या डब्यातून बाहेर काढली जाते. तिची किंमत २० रुपये आहे. पान मसाला आणि त्यासोबत मिळत असलेली छोटी पुडी एकत्रित मिसळल्यानंतर त्याचा गुटखा होतो.विक्री होणाऱ्या ठिकाणी ‘पुडी मिळेल का? अशी विचारणा केली तर लगेच होकार मिळतो. पानपट्टी चालक सकाळी टपरी उघडण्याअगोदरच खाणारे दारात थांबलेले असतात. 

तरुणाई वाहते या प्रवाहात
१२०, ३०० रुपयांचा मावा तोंडात टाकल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. महाराष्ट्रात बंदी आणि लगतच्या राज्यात गुटख्याची खुलेआम विक्री, यामुळे सीमाभागातून गुटख्याची आयात होते. मोठ्या वाहनातून गुटखा पकडला जात असल्याने कर्नाटक एस.टी.तून सॅकमधून हा गुटखा गडहिंग्लजसह सीमाभागातील गावात येत असल्याचे अन्न, औषधचे अधिकारी सांगतात. मध्यंतरी एस.टी.ची अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता संबंधित तरुण सॅक टाकून पसार झाला होता. 

अन्न औषधकडे केवळ सात निरीक्षक
गुटखा, मावा विक्रीवर कारवाईचे अधिकार आहेत, त्या अन्न, औषध प्रशासनाकडे जिल्ह्याचा कारभार सांभाळण्यासाठी केवळ सात अन्न निरीक्षक आहेत. खाद्यपदार्थांचे नमुने यांसह अन्य कामांचा कार्यभार केवळ सात जणांवर आहे. त्यामुळे गुटखा आणि मावा विक्रीवर कारवाईची इच्छा असली तरी अपुऱ्या मनुष्यबळामुळे ते शक्‍य नसल्याचे सांगण्यात आले.

मावा, गुटखा विक्रीचे हे आहेत हॉट स्पॉट
 सायबर चौक ,राजारामपुरी, शाहू मिल चौक, फोर्ड कॉर्नर   हुतात्मा पार्क, लक्ष्मीपुरी,  निवृत्ती चौक, उभा मारुती चौक,    ध्यानचंद हॉकी स्टेडियम, आपटेनगर चौक,  कसबा बावडा,  शिवाजी पूल, शिवाजी पेठ.

सात जणांवर हद्दपारीचा प्रस्ताव
गुटखा तस्करीत सातत्याने जे रेकॉर्डवर येतात, अशा सहा ते सात जणांवर हद्दपारीचा प्रस्ताव दिल्याचे सहाय्यक आयुक्त मोहन केंबळकर यांनी सांगितले. वाहनात गुटखा सापडल्यास संबंधित चालकाचा आणि वाहनाचाही परवाना रद्द होतो, असेही त्यांनी नमूद केले.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: जितेंद्र आव्हाड यांची विजयाच्या दिशेने वाटचाल!

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे शिवाजी कर्डिले १४९८४ मतांनी आघाडीवर.

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT