raju shetti  
पश्चिम महाराष्ट्र

Hatkanangale Lok Sabha: 'माझं काय चुकलं! शेतकऱ्यांनो तुम्हीही...'; हातकणंगलेतील पराभव राजू शेट्टींच्या जिव्हारी

कार्तिक पुजारी

कोल्हापूर- हातकणंगले लोकसभा निवडणुकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांचा पराभव झाला आहे. पराभवानंतर त्यांनी केलेली फेसबुक पोस्ट चर्चेत आली आहे. माझं काय चुकलं. प्रामाणिक असणे हा गुन्हा आहे का? असा सवाल राजू शेट्टी यांनी केला आहे. राजू शेट्टी शेतकऱ्यांवरही नाराज असल्याचं दिसत आहे. शेतकऱ्यांनो तुम्हीही..., असंही ते म्हणालेत.

हातकणंगलेमधील पराभवामुळे राजू शेट्टींना धक्का बसल्याचं दिसत आहे. त्यांना विजयाची अपेक्षा होती, पण मतदारांनी त्यांना नाकारलं आहे. हातकणंगलेमध्ये शिवसेना शिंदे गटाचे धैर्यशील माने यांचा विजय झाला आहे. माने यांचं मताधिक्य जास्त राहिलं नाही. मानेंना 13 हजार 426 मतं मिळाली. तर राजू शेट्टी यांना 1 लाख 79 हजार 850 मतं मिळाली. वंचितच्या उमेदवाराने मत विभाजनाचं काम केलं. वंचितच्या उमेदवाराला 32 हजार 696 मतं मिळाली.

हातकणंगलेमध्ये तिरंगी लढत होती. धैर्यशील माने, महाविकास आघाडीचे सत्यजीत पाटील आणि राजू शेट्टी यांच्यामध्ये ही लढत झाली. माने यांनी मतमोजणीच्या अखेरच्या टप्प्यात सत्यजीत पाटील यांचा पराभव केला. सत्यजीत पाटील यांनी चुरशीची लढत दिली. शिवसेनेच्या विभाजनानंतर मिळालेली सहानुभूती, शरद पवार गटाची ताकद, काँग्रेसची ताकद अशी शक्ती पाठीशी अजूनही पाटील यांचा निसटता पराभव झाला.

शाहूवाडी, हातकणंगले, इचलकरंजी, शिरोळ, इस्लामपूर आणि शिराळा या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश हातकणंगलेमध्ये होतो. हातकणंगले ऊस पट्ट्यात येतो. त्यामुळे राजू शेट्टींना या मतदारसंघातून अपेक्षा होती. राजू शेट्टी २००९ आणि २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टींचा विजय झाला होता. पण, २०१९ च्या निवडणुकीत त्यांचा शिवसेनेच्या धैर्यशील मानेंनी पराभव केला होता. माने यांनी त्यांचा ९६ हजार मतांनी पराभव केला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates: भारतीय हवाई दलाचा 92 वा वर्धापन दिन; चेन्नईत एअर शो

Ajit Pawar: पुण्यात भाजपकडून अजित पवारांना विरोध कायम.. ते भाजपचे कधीच होणार नाहीत!

Youtube Shorts Update : आता तुम्हीही बनू शकता यूट्यूबर; शॉर्ट्समध्ये भन्नाट अपडेट; आता तब्बल 3 मिनिटांचे व्हिडिओ बनवता येणार

ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये IND vs PAK सामना, पण हरमनप्रीत कौरची टीम आज हरली तर काय होणार? जाणून घ्या कधी, कुठे पाहता येणार

चलाख, Rishabh Pant! वर्ल्ड कप फायनलमध्ये लढवलेली शक्कल रोहित शर्माने सांगून टाकली Video

SCROLL FOR NEXT