health services working properly in sangli said collector of abhijit chaudhari 
पश्चिम महाराष्ट्र

आरोग्य यंत्रणेने पुन्हा मिशन मोडवर यावे; सांगली जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

सकाळ वृत्तसेवा

सांगली : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी उपलब्ध केलेल्या खासगी हॉस्पिटलसाठी पर्यवेक्षीय व प्रशासकीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर तातडीने कार्यान्वित करण्यात आली आहेत. एप्रिल 2021 मध्ये संपूर्ण महिना सुटीच्या दिवशीही (30 दिवस) कोरोना लसीकरण सुरू ठेवले आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करून कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेने पुन्हा एकदा मिशन मोडवर यावे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले. 

जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी सायंकाळी आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. चौधरी बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता प्रदीप दीक्षित, जिल्हा शल्य चिकित्सक संजय साळुंखे, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे, उपजिल्हाधिकारी विजया यादव, जिल्हा आरोग्य अधिकारी मिलिंद पोरे उपस्थित होते. 

जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, 'जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यास बेड्‌सची संख्या कमी पडू नये यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. बेड्‌स इन्फॉर्मेशन सिस्टीम नियमितपणे अद्ययावत करावी. रुग्णालयाच्या दर्शनी भागात रुग्णालयात एकूण उपलब्ध असणाऱ्या बेड्‌सची संख्या, उपचारार्थ असलेल्या रुग्णांची संख्या व रिक्त असलेल्या बेड्‌सची संख्या याबाबतची माहिती लावण्यात यावी. खासगी रुग्णालयांनी बिलिंगबाबत प्रशासनाने नेमून दिलेल्या ऑडिटरकडूनच बिलांची तपासणी करून घ्यावी.'

खासगी रुग्णालये प्रशासनाने दिलेल्या सूचनांची योग्य प्रकारे अंमलबजावणी करतात किंवा कसे याबाबतची पाहणी करून प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अहवाल द्यावेत. जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, 'जिल्ह्यातील सर्व उपजिल्हा रुग्णालयांनी कोरोना उपचारासाठीची यंत्रणा अद्ययावत करावी.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections: 'एम' फॅक्टरचा कौल MVAच्या बाजूने, सर्वात मोठ्या संघटनेच्या पाठिंब्यानं बळ वाढलं, महायुतीला टेन्शन

Mohammad Shami ने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ठोकली दावेदारी; गोलंदाजीनंतर फलंदाजीतही दाखवली चमक

Goa Tourism : जाऊ फुलपाखरांच्या गावा! गोव्यात बटरफ्लाय कंझर्व्हेटरीला नक्की भेट द्या, फि,वेळ आणि ठिकाण जाणून घ्या सर्वकाही

Vinod Tawde : अजित पवारांना सोबत घेतल्याचे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी स्पष्टच सांगितले कारण...

Vinod Tawde: पुन्हा शरद पवार पावसात भिजले; भाजपचे तावडे म्हणाले, हा जिंकण्याचा 'भ्रम'...

SCROLL FOR NEXT