rain sakal
पश्चिम महाराष्ट्र

निपाणीसह परिसरात मुसळधार पाऊस; नागरिकांची तारांबळ

निपाणी शहर व परिसरात गुरुवारी (ता. 10) सायंकाळी 7 च्या सुमारास सुसाट वारयासह विजांच्या गडगडासह मुसळधार पाऊस झाला.

सकाळ वृत्तसेवा

निपाणी शहर व परिसरात गुरुवारी (ता. 10) सायंकाळी 7 च्या सुमारास सुसाट वारयासह विजांच्या गडगडासह मुसळधार पाऊस झाला.

निपाणी - शहर व परिसरात गुरुवारी (ता. 10) सायंकाळी 7 च्या सुमारास सुसाट वारयासह विजांच्या गडगडासह मुसळधार पाऊस (Rain) झाला. अचानक आलेल्या पावसामुळे फेरीवाल्यांसह व्यापारयांची (Traders) तारांबळ उडाली. शहरातील मुख्य आठवडी बाजार असल्याने नागरिकांची बाजारासाठी वर्दळ वाढली होती. दुपारी परिसरात ठिकठिकाणी पाऊस झाला. सायंकाळी दमदार पाऊस झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे बसस्थानकासह शहरात अंधाराचे साम्राज्य पसरले होते.

आंबा मार्केट, अक्कोळ रोडसह परिसरात ठिकठिकाणी खड्ड्यात पाणी साचल्याने दुचाकीस्वारांसह वाहनधारकांना खड्ड्यांचा अंदाज येत नव्हता. त्यामुळे वाहने सावकाश हाकावी लागली. शिवाय वाहन चालविताना कसरत करावी लागली. आठवडी बाजारामुळे नागरिकांची ये-जा सुरु होती. दमदार पाऊस असल्याने ठिकठिकाणी पाणी साचून राहिले होते. गटारी भरून वाहत होत्या.

जत्राट परिसरात पाऊस

जत्राट व परिसरात गुरुवारी सायंकाळी जोराचा पाऊस झाला. त्यामुळे शेतकरयांची तारांबळ उडाली. सध्या विविध कामे सुरु असून सायंकाळी अचानक पाऊस आल्याने कामांची खोळंबा झाला. वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे गृहिणींची तारांबळ झाली. तब्बल तासभर पाऊस झाल्याने सर्वत्र पाणी साचले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Candidate First List : विधानसभेसाठी काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर; पुण्यातून एकमेव धंगेकरांचं नाव; वाचा संपूर्ण यादी

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांविरोधात काँग्रेसचा 'हा' उमेदवार; २०१४ मध्ये दिली होती लढत

Burger: बर्गरमधून विषाणूचा प्रसार; ४९ जणांना बाधा, एकाचा मृत्यू, १० राज्यांमध्ये फैलाव

Maharashtra Assembly Election 2024 : भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्यांना संधी दिलेली नाही, फिल्टर लावूनच उमेदवारांची निवड - जयंत पाटील

Mohol Assembly Election : निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून आमदार यशवंत यांनी माने यांनी दाखल केली उमेदवारी

SCROLL FOR NEXT