farmer 
पश्चिम महाराष्ट्र

कसे जगायचे...पतसंस्थांमध्ये अडकल्या 957 कोटींच्या ठेवी

तात्या लांडगे

सोलापूर : ज्यादा व्याजदराच्या आशेने पतसंस्थांमध्ये ठेवलेल्या 59 लाख 28 हजार सभासदांच्या 957 कोटी 39 लाखांच्या ठेवी मागील अडीच- तीन वर्षांपासून मिळाल्याच नाहीत. भविष्यकाळातील आरामदायी जीवनाचे स्वप्न पूर्ण करण्याच्या उद्देशाने रात्रंदिवस मेहनत करुन पै पै जमा करुन सभापसदांनी या ठेवी पतसंस्थांमध्ये जमा केल्या. मात्र, राजकीय हस्तक्षेपामुळे कारवाईला अडथळा येत असल्याचे सहकार विभागातील सूत्रांनी सांगितले. 

जिल्ह्यांचा आराखडा राजकीय हस्तक्षेपामुळे कागदावरच
पतसंस्थांमध्ये ठेव म्हणून ठेवलेली रक्‍कम परत मिळावी यासाठी ठेवीदारांनी संबंधित पतसंस्थांचे तथा संचालकांचे उंबरठे झिजवले मात्र, काहीच उपयोग झाला नाही. काही ठेवीदारांचा मृत्यूही झाला परंतु, एकरकमी परतफेड योजना सुरु करुनही ठेवी मिळाल्याच नाहीत, असे चित्र आहे. प्रत्येक जिल्हा उपनिबंधकांनी आपापल्या जिल्ह्यातील अडचणीतील पतसंस्था अन्‌ त्यामध्ये ठेवीदारांच्या अडकलेल्या ठेवी वसुलीच्या दृष्टीने ठोस कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश सहकार आयुक्‍तांनी दोन वर्षांपूर्वी दिले. मात्र, काही जिल्ह्यांनी आराखडा तयार केलाच नाही तर बहूतांश जिल्ह्यांचा आराखडा राजकीय हस्तक्षेपामुळे कागदावरच असल्याचे दिसून येते. राष्ट्रीयीकृत अथवा जिल्हा सहकारी मध्यवर्ती बॅंकांच्या गावोगावी शाखा नसल्याने गावोगावी भरमसाठ पतसंस्था सुरु करण्यात आल्या. ठेवीदारांचा विश्‍वास संपादन करुन ठेवीत वाढही झाली मात्र, काही कर्जदार तथा संचालक मोठे भांडवलदारही झाले. परंतु, व्याजासह सोडाच मूळ मुद्दलही ठेवीदारांना मिळत नसल्याचे चित्र आहे. 


राज्याची सद्यस्थिती 
एकूण पतसंस्था 
13,489 
अडचणीतील पतसंस्था 
469 
अडकलेल्या ठेवी 
957.39 कोटी 
अडचणीतील ठेवीदार 
59.28 लाख 


संचालकांवर लवकरच जबाबदारी निश्‍चिती 
राज्यातील पतसंस्थांमध्ये ठेवीदारांच्या अडकलेल्या ठेवी परत मिळाव्यात यादृष्टीने 101 अंतर्गत कारवाई सुरु असून जप्तीच्या माध्यमातून सुमारे 25 कोटींची वसुलीही केली आहे. काही संचालकांवर जबाबदारी निश्‍चित करुन वसुली सुरु असून काही महिन्यांत वसुलीची अपेक्षा आहे. 
- मिलिंद सोबळे, विभागीय उपनिबंधक, पतसंस्था, सहकार आयुक्‍तालय, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed VBA: बीडमधील अपक्ष उमेदवाराला काळं फासून मारहाण! वंचितच्या पदाधिकाऱ्यांचं कृत्य; भाजपला पाठिंबा दिल्यानं आक्रमक

हिवाळ्यात कंबरदुखीपासून आराम मिळवायचा आहे? उपाशी पोटी या पदार्थाचा करा सेवन

Maharashtra Election: उमेदवारांचा प्रचार नागरिकांच्या जीवावर! काँग्रेसच्या प्रचार रॅलीत फटाके फोडल्यानं ९ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी

तिलक-संजूची शतकं, अल्लू अर्जूनसारखी स्टाईल, जर्सी नंबरचं सिक्रेट अन् कॅप्टन रोहितला स्पेशल मेसेज; BCCI चा खास Video

Latest Maharashtra News Updates live : दिवाळीनंतर कार्यकर्त्यांची दिवाळी

SCROLL FOR NEXT