crime news Google
पश्चिम महाराष्ट्र

विट्यातील थरारक घटना ; पत्नीचा पाठलाग करून पतीने काढला काटा

सकाळ डिजिटल टीम

विटा (सांगली) : मूळ गावी राहण्यास जाण्याच्या कारणावरून झालेल्या पती - पत्नीच्या वादात पतीने पत्नीच्या पोटात चाकूने भोसकून खून केल्याची घटना आज सकाळी विटा येथील बर्वे मळ्यानजीक घडली. लिलावतीदेवी नरेश साह ( वय ३२ ) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. तर पती नरेश रघुवीर यास ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.

बिहार राज्यातील नवादाखास येथील हे परप्रांतीय कुटुंब आहे. लिलावती यांचा पती नरेश हा विटा येथे एका ठेकेदाराकडे सेट्रींग कामगार म्हणून काम करत आहे. तर त्याची मुलगी नवादाखास येथे राहण्यास आहेत. काल ( ता. २९ ) लिलावतीदेवी व त्यांची मुलगी रूबीकुमारी विटा येथे पती नरेश यांच्याकडे राहण्यास आले होते. पत्नी लिलावतीदेवी हिने आज सकाळी नरेश यांना आपल्या मुळ गावी राहण्यास चला असे म्हणाल्याने दोघांत वाद सुरू झाला. या वादात नरेश याने पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे भितीने त्या घरापासून बर्वे मळ्यानजीक असणा-या रस्त्यावर आल्या.

पत्नीचा पाठलाग करत नरेशने त्यांना पकडले. पत्नीला खाली पाडून सोबत आणलेल्या चाकूने पोटात वार केल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना विटा ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तत्पुर्वी लिलावतीदेवी यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Mahadik : 'या मुन्नाचा भांगसुद्धा कोणी वाकडा करू शकत नाही'; खासदार महाडिकांचा उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला

Latest Maharashtra News Updates : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार नवाब मलिक आणि सना मलिक यांच्या बाईक रॅलीला सुरूवात

मृणाल दुसानिस झाली बिसनेसवूमन! ठाण्यात 'या' ठिकाणी सुरू केलं नवं हॉटेल; पाहा आतून कसं आहे अभिनेत्रीचं 'बेली लाफ्स'

सावधान! व्हॉट्सॲपवर लग्नाची आमंत्रण पत्रिका येताच क्लिक करू नका, नाहीतर होईल मोठी फसवणूक, वाचा 'या' नव्या स्कॅमबद्दल

जिगर लागतो...! खांद्याला दुखापत, तरीही ऑस्ट्रेलियन खेळाडूने संघासाठी एका हाताने केली फलंदाजी

SCROLL FOR NEXT