सोलापूर : ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रा अवघ्या 15 दिवसांवर येऊन ठेपली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही गड्डा यात्रा होम मैदानावर भरणार आहे. त्याचबरोबर कृषी प्रदर्शनसुद्धा भरविण्यात येणार असल्याची माहिती जागा वाटप समितीचे सदस्य बाळासाहेब भोगडे यांनी दिली. होम मैदानावर खाद्यपदार्थांसह कपडे, सौंदर्य, मनोरंजनाच्या वस्तू आनंद नगरी तसेच जावर ऍम्युझमेंट्स राईडच्या बांधणीसह इतर स्टॉल उभारण्यास जोमाने सुरवात झाली आहे.
हेही वाचाच...बेळगावला जाताय माहिती असू द्या...लालपरीची वाहतूक बंद
यात्रेसाठी परराज्यातील मनोरंजनाचे स्टॉल येत आहेत. याचबरोबर विविध वस्तू विक्रीचे स्टॉल तसेच फूड स्टॉल उभारण्याचे काम सुरू आहे. रस्त्यावर दोन्ही बाजूंनी खेळणी, विविध दालनाच्या उभारण्यासाठीही जोमाने काम सुरू आनंद नगरीच्या बाहेरही अनेक मनोरंजनाचे स्टॉल दोन्ही बाजूला उभारले जाणार आहेत. अशा प्रकारचे 220 स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. पाळणे, टोरा टोरा, ब्रेक डान्स, स्टॉल उभारणीचे काम सुरू आहे. त्याचबरोबर यंदा 13 ते 18 जानेवारी दरम्यान होम मैदानावरच कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये 70 ते 80 शेतीशी निगडीत अवजारे, अद्ययावत मशिनरी, रोपवाटिका, बियाणे, खते स्टॉल्स असणार आहेत.
रंगरंगोटीने मंदिर परिसर होतोय चकाचक
सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिरात रंगरंगोटी आणि स्वच्छतेच्या कामांना वेग आला आहे. यात्रेत मंदिर परिसर चकाचक करण्यासाठी कर्मचारी झटू लागले आहेत. सोलापुरातील सिद्धरामेश्वरांची यात्रा जिव्हाळ्याचा विषय आहे. या यात्रेत केवळ सोलापुरातीलच नव्हे तर महाराष्ट्रासह शेजारच्या कर्नाटक, आंध्र प्रदेश येथून देखील भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनाला येतात. यामुळे विजापूर रोडवरील रेवणसिद्धेश्वर मंदिर, मल्लिकार्जन मंदिर, आलमप्रभू मंदिर, अक्षता सोहळ्याच्या मंदिराचे बांधकाम सुमारे 1886 मध्ये करण्यात आले आहे. अष्टविनायक गणपती मंदिर आणि 68 लिंगांच्या मंदिराला वैशिष्ट्यपूर्ण रंगांनी आणखी कशा पद्धतीने आकर्षक करत रंगोटी करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. यासाठी मंदिर समितीचे पदाधिकारी, कर्मचारी झटत आहेत. फिकट पिवळा आणि भगवा-पांढरा रंग देण्यात येत आहे. दरवर्षीचा यात्रेचा उत्साह आणखी वाढत चालल्याने भाविकांची तसेच संपूर्ण मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्याची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मंदिर परिसर चकाचक होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.