Raju Shetty- Sadabhau Khot Sakal
पश्चिम महाराष्ट्र

Islampur News : शेतकरी संघटनेच्या नेत्यांच्या संपत्तीची चौकशी करा - हणमंतराव पाटील

राजू शेट्टी यांची जनआक्रोश यात्रा ही ‘मलिदा’ मागण्यासाठी निघालेली यात्रा आहे. तर सदाभाऊ खोत यांनी मंत्री झाल्यापासून शेतक-यांसाठी किती आंदोलने केली?

सकाळ वृत्तसेवा

इस्लामपूर - राजू शेट्टी यांची जनआक्रोश यात्रा ही ‘मलिदा’ मागण्यासाठी निघालेली यात्रा आहे. तर सदाभाऊ खोत यांनी मंत्री झाल्यापासून शेतक-यांसाठी किती आंदोलने केली? त्यामुळेच सर्वच शेतकरी संघटनांच्या नेत्यांची आर्थिक संपत्तींची चौकशी व्हावी, अशी मागणी रघुनाथदादाप्रणित शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हणमंतराव पाटील व तालुकाध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली.

उसाला प्रतिटन पाच हजार रुपये दर मिळाला पाहिजे तसेच दोन साखर कारखान्यांमधील व इथेनॉलमधील हवाई अंतराची अट कायमची काढून टाकण्याची मागणी राजू शेट्टी करत असतील तर आम्ही त्यांचे नेतृत्व मान्य करू, असेही ते म्हणाले.

ते म्हणाले, 'शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांनी आपली स्वत:ची प्रॉपर्टी विकून संघटना चालवली. मात्र त्यांच्याच संघटनेतून वेगळ्या झालेल्या नेत्यांची आर्थिक संपत्ती किती आहे ती पहावी. शेट्टी यांची संघटना ही कारखानदारांनी पाळलेली संघटना आहे. कारखानदारांनी मलीदा दिला की हे आंदोलनात उतरतात. ते आमदार, खासदार झाल्यापासून शेतक-यांच्या उसाला दर मिळत नाही.

कारखानदारांनी या हंगामात उसाला ५ हजार रूपये दर द्यावा व मागील वर्षी गेलेल्या उसास दिवाळीपुर्वी १ हजार रूपये द्यावे. गाय दुधाला डिझेलचा तर म्हैस दुधाला पेट्रोलच्या दराप्रमाणे दर मिळावा. अन्यथा मुंबईला जाणारा भाजीपाला, साखर, दूध बंद करून गनीमी काव्याने आंदोलन करू."

धनपाल माळी म्हणाले, 'सरकारने बाहेरील राज्यात उस घालवण्यासाठी परवानगी नाकारली होती. मात्र सदाभाऊ बोलल्यावर ती मागे घेतली. सदाभाऊंचे महत्व वाढवण्यासाठी तुम्ही घोषणा केली होती काय? अशी शंका आहे.'

लक्ष्मण पाटील म्हणाले, '१३ वर्षापूर्वी साखर कारखान्यांनी २७०० ते २८०० रूपयांच्या आसपास दर दिला होता. त्यावेळी एफआरपी. तेराशे रूपये होती. उतारा साडे बारा टक्के होता. मात्र आजचा साखरेचा दर पाहता उसाला ५ हजार रूपये दर कारखानदारांनी दिलाच पाहिजे. काही शेतकरी नेत्यांनी स्वत:चे पक्ष स्थापन करून कोटयावधी रूपयांची माया जमवली आहे.'

यावेळी युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष केतन जाधव, माणिकराव पाटील, सयाजी पाटील, महादेव पवार, विकास चिंचोलकर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT