Soldier 
पश्चिम महाराष्ट्र

वीरपत्नींचे कुंकू अमर; या परंपरेचा घडेल इतिहास

सकाळ वृत्तसेवा

सातारा : जयहिंद फाउंडेशन या हुतात्मा कुटुंबीयांसाठी काम करणाऱ्या संस्थेने हुतात्मा जवानांची वीरमाता व वीरपत्नी यांच्यासाठी अनोखा हळदी- कुंकू कार्यक्रम घेऊन या माता- बघिनींचा सन्मान केला. या अगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे जिल्ह्यातून कौतुक होत आहे. 

येथील तोफखाने सांस्कृतिक भवनामध्ये झालेल्या कार्यक्रमासाठी व्याख्याते सागर पवार, प्राचार्य प्रभा कदम, डॉ. शुभांगी पाटील, प्रा. आसावरी शिंदे, सुनीता शिंदे, स्नेहलता शिंदे, जयहिंद फाउंडेशनच जयदीप भोसले, जवान अजित डेरे, वैभव कदम, स्वप्नील मांढरे, आत्माराम लोहार यांची प्रमुख उपस्थिती होती.

सागर पवार म्हणाले, ""देशाच्या सीमेवर अहोरात्र देशरक्षण करणारे जवान आणि अवघ्या जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी राजा हेच या राष्ट्राचे खरे रक्षक असून, देश यांच्यापासूनच प्रेरणा घेत आहे. देशाला छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे, महात्मा फुले, शाहू महाराज, आंबेडकरांची परंपरा असून, जवान याच विचारांचे पाईक आहेत. हुतात्मा जवान हे अमर असून, त्यांच्या वीरपत्नींचे कुंकू हे सुद्धा अमरच आहे. म्हणून जय हिंद फाउंडेशनचे हे कार्य कौतुकास्पद असून, हुतात्मा जवानांच्या वीरपत्नींच्या हळदी- कुंकूवाची ही परंपरा देशभर पसरेल.'' 

प्रा. प्रभा कदम म्हणाल्या, ""स्त्री ही सहिष्णू असून, संसार उभा करण्याची फार मोठी शक्ती तिच्यात आहे. या देशाला सावित्राबाई फुले यांचा देदीप्यमान इतिहास असून, क्रांतीची ज्योत वीर पत्नींनी पेटवून स्वावलंबी व्हावे. समाजातील अनिष्ठ रूढी, परंपरा, प्रथांना फाटा देण्यास आपणच सुरुवात करूयात.'' या वेळी आसावरी शिंदे, हेमलता फडतरे, सुनीता कदम, डॉ. शुभांगी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. जयहिंद फाउंडेशनच्या सातारा शाखेचे अध्यक्ष ऍड. जयदीप भोसले यांनी प्रास्ताविक केले. पल्लवी बाबर यांनी सूत्रसंचालन केले. स्नेहलता कदम, सोनम सावंत यांनी आभार मानले. 

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी उपाध्यक्ष दत्ता साळुंखे, हणमंतराव चिकणे, पंकज कुलकर्णी, ऍड. धनंजय फरांदे, स्नेहलता शिंदे, मंदार शेटे, मकरंद देशमुख, रमाजाण पुणेकर, शिवराज झांजुर्णे, सागर जायगुडे, उमेश मोरे, अजित भोसले, वंजारी तात्या आदींनी परिश्रम घेतले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT