पश्चिम महाराष्ट्र

जयंत पाटलांनी घेतली कर्नाटक मुख्यमंत्र्यांची भेट; काय झाली चर्चा?

यंदा अतिवृष्टी आणि पुरामुळे कमीतकमी धोका संभावला.

महेश काशिद

बेळगाव : अतिवृष्टी व पूरस्थिती समन्वय संदर्भात महाराष्ट्र पाठबंधारे मंत्री जयंत पाटील (jayant patil) आणि अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (basavraj bommai) यांची आज (६) बंगळूरुला (bengaluru) भेट घेतली. यावेळी मंत्री मुरगेश निराणी उपस्थित होते. अतिवृष्टी आणि पूरस्थिती नियंत्रणासाठी गेल्या महिन्यांत माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा आणि मंत्री जयंत पाटील यांची बैठक होऊन व्यापक चर्चा करण्यात आली होती.

दरम्यान यावेळी अतिवृष्टी व पुरामुळे उद्‍भवणाऱ्या संभाव्य धोक्याबाबत व्यापक चर्चा करण्यात आली होती. त्यानुसार यंदा अतिवृष्टी आणि पुरामुळे (flood and heavy rain) कमीतकमी धोका संभावला. पण, त्यानंतर राज्यात मोठे बदल घडले. राज्याचे नेतृत्व बदलले. येडियुराप्पा यांना पायउतार व्हावे लागले आणि त्याजागी मुख्यमंत्री म्हणून बसवराज बोम्मई यांच्या निवडीची घोषणा केली.

मुख्यमंत्रीपदाची शपथ व मंत्रीमंडळ विस्तारीकरण झाल्यानंतर आता नियमित कामकाजाला सुरवात केली आहे. त्यामुळे जयंत पाटील यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली आहे. यावेळी मंत्री निराणीसह महाराष्ट्रातील नेते आणि अधिकारी उपस्थित होते. यावेळी श्री पाटील यांनी मुख्यमंत्री बोम्मई यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. यानंतर अतिवृष्टी व पूरस्थिती संदर्भात दोन्ही राज्यात समन्वय ठेवण्याबाबत व्यापक चर्चा करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: मोदींचा मेमरी लॉस... राहुल गांधींनी अमेरिकेच्या माजी अध्यक्षांचा किस्सा सांगत केली तुलना, अमरावतीत फटकेबाजी

Parenting Tips: पालकांच्या 'या' चांगल्या सवयींमुळे मुले होतात शिस्तबद्ध, तुम्हीही करू शकता फॉलो

Mumbai High Court : १८ वर्षाखालील पत्नीशी संबंधही बलात्काराच, उच्च न्यायालयाचे निरीक्षण

Mumbai: काँग्रेसचा 'मुंबईनामा' अदानींना धक्का? पोस्टरवर सोनिया गांधींच्या जागी बाळासाहेबांचा मोठा फोटो, काय आहे जाहीरनाम्यात ?

Jhansi Fire Incident : फायर अलार्म वाजला असता तर वाचला असता 10 मुलांचा जीव!

SCROLL FOR NEXT