सांगली : सांगलीतील महापालिकेतील सत्तांतरावर आज प्रथमच भाष्य करताना पालकमंत्री जयंत पाटील यांनी या मंडळींनी मला अंधारात ठेवून सारे काही केल्याचा विश्वामित्री पवित्रा घेतला. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर त्यांचीच फिरकी घेत मंत्री पाटील यांनी मला त्या काळात कोरोना झाला होता, त्यामुळे त्यावेळी अंधारात बसायचे असते असं सांगत अनभिज्ञत असल्याचे स्मीतहास्य करीत सांगितले.
भाजपला महापालिकेत पाच वर्षासाठी सत्ता दिली आहे. त्यामुळे आता महापालिकेच्या सत्तेत स्वारस्य नाही असं दोन महिन्यापुर्वी सांगितले असताना अचानकपणे महापालिकेतील सत्तेत आपल्याला स्वारस्य कसे वाटले, या थेट प्रश्नाला बगल देत जयंत पाटील यांनी आज प्रथमच सत्तांतरावर मिश्किली केली. ते ते म्हणाले, 'खरं सांगू का मला त्यावेळी कोरोना झाला होता. डॉक्टरांनी मला घरातच बसायचा सल्ला दिला होता. मला अंधारात ठेवूनच इथे सारे काही झाले. असो आता या मंडळींनी केलं तर आपल्याला निस्तरलं पाहिजे.
महापालिकेत मी यावं यासाठी मला आधीच्या महापौरांनी निमंत्रण दिलंच होतं. त्यानुसारच मी आत्ता आलो आहे. यात कोणताही पक्षीय अभिनिवेश नाही. राज्य सरकारकडून महापालिकेच्या अपेक्षा आहेत. आम्हाला बोलवलं तर प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील अशी त्यांची भावना आहे. त्यामुळेच आज मी इथं आलो. सारी माहिती घेतली. त्यातल्या सरकार पातळीवरच्या गोष्टी नक्की मार्गी लागतील. येत्या गुरुवारी आम्ही मुंबईत प्रमुख पदाधिकाऱ्यांसमवेत पुन्हा बैठक घेऊन कामाला गती देऊ.'
...ते आमच्या संपर्कात
आढावा बैठकीवर भाजपच्या बहिष्कारावर मंत्री पाटील म्हणाले, 'बहिष्कार वगैरे काही नाही. त्यांच्या अनेक मंडळींनी आपल्यावर बैठकीला जाऊ नये यासाठी दबाव असल्याचे मला फोनवरून सांगितले. मीच त्यांना तुम्ही लगेच इकडे येऊ नका असे त्यांना सांगितलेय. आणि कोरोना असल्याचं तुम्ही सारे जाणताच. त्यामुळे सभागृह आता हाऊसफुल्ल झाल्याने आता आणखी लोकांना आत कसं घेणार? हे तुम्ही जाणताच.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.