पश्चिम महाराष्ट्र

कालकुपी ः सोलापुरातील हुतात्मा बाग - 01

विजयकुमार सोनवणे


सोलापूर ः सुमारे 66 वर्षांपूर्वी 1952-53 च्या सुमारास वसविण्यात आलेली हुतात्मा बाग ही सोलापूरचे वैभव आहे. चार हुतात्म्यांच्या स्मृती प्रित्यर्थ ही बाग वसविण्यात आली. 1953 मध्ये घेण्यात आलेले छायाचित्र हे महापालिकेच्या दिशेने किल्ल्याच्या तटबंदीवरून घेण्यात आले आहे. उत्कृष्ट बाग कशी असते याचे हे उत्तम उदाहरण आहे. तत्कालीन नगरपालिकेने 20 हजार रुपये खर्च करून ही बाग विकसीत केली. जगन्नाथ शिंदे, अब्दूल रसूल कुर्बान हुसेन, मल्लप्पा धनशेट्टी आणि श्रीकिसन सारडा या हुतात्म्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या बागेला हुतात्मा बाग असे नाव देण्यात आले.

इंग्रज अधिकाऱ्याने केली विकसीत बाग
सिद्धेश्‍वर तलाव आणि परिसरातून येणारे पाणी किल्ल्याच्या खंदकात साठल्यामुळे अनारोग्याची स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे तत्कालीन इंग्रज अधिकारी श्री. ह्युलेट यांनी किल्ला खंदकात बाग विकसीत करण्याची कल्पना 1886 मध्ये मांडली. प्रत्यक्षात त्याच्या कामाला 1949 मध्ये सुुरवात झाली. खंदकात बाग हे कोणालाच पटेना. अनेकांनी त्यावर आक्षेप घेतले. परंतु नगरपालिकेने ते काम निर्धाराने सुरु ठेवले. त्यासाठी मुंबईतील डायरेक्‍टर ऑफ पार्कस ऍन्ड गार्डन्स या संस्थेकडून नकाशा तयार करून घेण्यात आला. या बागेचे क्षेत्रफळ 2 लाख 35 हजार चौरस फूट आहे. या बागेची आकर्षक रचना असून त्यावर लहान मोठे हराळी प्लॉटस आहेत. किल्ल्याच्या पश्‍चिमेस असलेल्या परिसरात ऐंशी हजार चौरस फूट जागेत खेळणी आणि विविध प्राण्यांची व्यवस्था होती. सध्या ही बाग स्मार्ट सिटी अंतर्गत विकसीत करण्यात आली आहे. त्यामुळे या बागेचे रुपडे बदलले आहे.

 "इतिहास आणि आधुनिकतेचा' अनोखा संगम
भुईकोट किल्ल्याला कोणत्याही प्रकारचा धक्का न पोचविता या परिसराला आधुनिकतेची जोड देत येथील हुतात्मा बागेचा विकास करण्यात आला आहे. उजाड माळरानाचे स्वरूप असलेल्या या बागेचे सौंदर्य आता बहरले आहे. त्यामुळे "इतिहास आणि आधुनिकते'चा अनोखा संगम या ठिकाणी बघायला मिळत आहे. भुईकोट किल्ल्याला कोणत्याही प्रकारचा धक्का न पोचविता नैसर्गिक प्रकारचे साहित्य वापरण्यात आले आहे. त्यामुळे हुतात्मा बागेत अनोखी रंगसंगती दिसून येत आहे. खंदक बागेत फरशीचा ट्रॅक करण्यात आला आहे. बेंच बसविण्यात आले आहेत. तसेच चौपाटीकडून तसेच हिराचंद नेमचंद वाचनालयासमोरून खंदक बागेत जाणारा रस्ताही दुरुस्त करण्यात आला आहे. एकंदरीतच, हुतात्मा बाग आणि खंदक बागेत अत्याधुनिक पद्धतीने सुधारणा करण्यात आल्या आहेत. 

हुतात्मा बागेतील आकर्षण
- 170 अत्याधुनिक पद्धतीचे दिवे
- आकर्षक खेळणी
- मुलांसाठी अभ्यासिका
- रंगीत कारंजाचे आकर्षण
- लाल मातीचा ट्रॅक
- विविध प्रकारची फुलझाडी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: विधानसभा निवडणुका जिंकण्याचा एकनाथ शिंदेंचा हा आहे 'मास्टर प्लॅन'; ठाण्यात नाही तर 'या' ठिकाणी ठोकणार तळ

SA vs IND: मी फार विचार केला, तर इमोशनल होईन; १० वर्ष मी वाट पाहिली! Sanju Samson ने मैदानासोबत मनंही जिंकली

Pune Crime: पुण्यातील 'त्या' 5 मुलींनी घेतला मोकळा श्वास, पोलिसांची मोठी कारवाई

शेतकऱ्यांची होणार संपूर्ण कर्जमाफी! राज्यातील साडेपंधरा लाख शेतकरी थकबाकीत; कर्जमाफीसाठी लागणार 30,495 कोटी; जाणून घ्या, जिल्हानिहाय थकबाकीदार शेतकरी

Raju Patil: ...यांच्या नियत मध्ये खोटं आहे, त्याप्रमाणे घडलं; खासदार डॉ. शिंदेंनी मैत्री न निभावल्याने मनसे आमदार पाटील दुखावले

SCROLL FOR NEXT