CM Siddaramaiah esakal
पश्चिम महाराष्ट्र

महाराष्ट्रातील कन्नड शाळांना कर्नाटकाचे शिष्टमंडळ भेट देणार; मुख्यमंत्री करणार 'या' आमदारांशी चर्चा, काय आहे कारण?

सकाळ डिजिटल टीम

कन्नड शाळातील बिगर कन्नड शिक्षकांची नियुक्ती चुकीची आहे. भाषेच्या आधारावर राज्याच्या स्थापनेवेळी मंजूर केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे हे उल्लंघन आहे.

बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) यांनी कर्नाटक सीमाभाग विकास प्राधिकरणाच्या (कर्नाटक बॉर्डर एरिया डेव्हलपमेंट ॲथॉरिटी) पदाधिकाऱ्यांना मंगळवारी (ता. २५) महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील कन्नड शाळांना (Kannada School) भेट देण्याची सूचना केली. शिष्टमंडळाला (Karnataka Delegation) दौरा करून स्थानिक लोकप्रतिनिधींची भेट घेऊन महाराष्ट्रा सरकारतर्फे चालवल्या जाणाऱ्या कन्नड शाळांमध्ये बिगरकन्नड भाषिक शिक्षकांच्या नियुक्तीबाबत अधिक माहिती घेण्यास सांगितले.

प्राधिकरणाचे शिष्टमंडळ सांगली (Sangli) जिल्ह्यातील जत आणि सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट या तालुक्यांतील कन्नड कार्यकर्त्यांसह महाराष्ट्राच्या सीमावर्ती तालुक्यांतील आमदारांना भेटणार आहे. महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) ११ कन्नड शाळांमध्ये १५ शिक्षकांची नियुक्ती केली आहे. जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी काही दिवसांपूर्वी पहिल्यांदाच हा मुद्दा उपस्थित केला होता. ज्या विद्यार्थ्यांची मातृभाषा कन्नड आहे, अशा परिस्थितीत मराठी भाषिक शिक्षकांची नियुक्ती केल्यास ते शिक्षणापासून वंचित राहतील, असे त्यांनी सांगितले होते.

आमदार सावंत यांच्यासोबत अक्कलकोटचे भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी हेही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. कर्नाटक सीमाभाग विकास प्राधिकरणाचे सचिव प्रकाश मथिहळ्ळी यांनी सांगितले, की कन्नड शाळातील बिगर कन्नड शिक्षकांची नियुक्ती चुकीची आहे. भाषेच्या आधारावर राज्याच्या स्थापनेवेळी मंजूर केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे हे उल्लंघन आहे. आम्ही कर्नाटकमध्ये भाषिक अल्पसंख्याकासाठी शाळा देखील चालवत आहोत.

जिथे आम्ही मातृभाषा शिक्षकांची नियुक्ती करतो. त्यांच्या संवादाची पहिली ही मातृभाषा आहे. मग ते शिक्षक इतर कोणताही विषय शिकवत नाहीत. मथिहळ्ळी पुढे म्हणाले की, आता हा मुद्दा समोर आल्यानंतर कर्नाटक सरकारने महाराष्ट्र सरकारला नियमांच्या उल्लंघनांबद्दल माहिती दिली आहे. आपल्या निर्णयात बदल करण्यासाठी फेरविचार करण्याची विनंती केली आहे. तथापि, महाराष्ट्राने आतापर्यंत काहीही केले नाही. आम्हाला वाटते की महाराष्ट्र सरकार हे मुद्दाम करत असावे.

विविध विषयांसाठी विशेषतः भाषा विषयांसाठी बिगरकन्नड शिक्षकांच्या नियुक्तीमुळे अध्यापनावर परिणाम होणार नाही. हे शिक्षक कन्नड व्यतिरिक्त इतर विषय शिकवतील. त्यामुळे अध्यापनाच्या गुणवत्तेत कोणतीही अडचण येणार नाही. आम्ही या शाळांमध्ये कन्नड शिक्षकांचीही नियुक्ती करणार आहोत.

-सुरेश खाडे, महाराष्ट्राचे कामगार मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री

सीमावर्ती १३७ कन्नड शाळा

महाराष्ट्रातील सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदांद्वारे चालवल्या जाणाऱ्या सुमारे १३७ कन्नड शाळा आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway Track मेन्टेनन्स मशीनची समोरासमोर धडक; 5 कर्मचारी जखमी, देखभालीचं काम सुरू असताना घटना

IND W vs PAK W: ०.४४ सेकंद! Richa Ghosh ची भारी रिअ‍ॅक्शन, अविश्वसनीय झेल घेऊन पाकिस्तानला दाखवला इंगा

Bigg Boss Marathi 5 Grand Finale LIVE Updates - 'बिग बॉस मराठी ग्रँड फिनालेला सुरुवात; रितेश भाऊंचा कल्ला सुरू

Video : शाळेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांनी गायलं 'अयि गिरि नन्दिनी'; नेटकरी झाले मंत्रमुग्ध, येथे पाहा Viral Video

Latest Maharashtra News Updates: पियुष गोयल यांच्या हस्ते मालाडमधील मनपा शाळेचे उद्घाटन

SCROLL FOR NEXT