killed in two wheeler Accident Devchand College nipani  sakal
पश्चिम महाराष्ट्र

दुचाकींच्या धडकेत निपाणीचा एक ठार; एक जखमी

देवचंद महाविद्यालयाजवळ अपघात : धामणीचा दुचाकीस्वार गंभीर

राजेंद्र हजारे

निपाणी : दोन दुचाकींच्या धडकेत निपाणीचा एक जण जागीच ठार तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. बुधवारी (ता. ९) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास निपाणी-मुरगुड रोडवरील देवचंद महाविद्यालयाजवळ हा अपघात झाला. आकाश उर्फ अक्षय सुरेश मातीवड्डर (वय २६, रा. वड्डर गल्ली, जुने संभाजीनगर, निपाणी) असे मयताचे नाव आहे. तर कृष्णा पांडुरंग मुगळे (वय ४०, रा. धामणे, ता. आजरा) असे गंभीर जखमीचे नाव आहे.

याबाबत पोलिस आणि घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, मयत आकाश हा गवंडी काम करत होता. बुधवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास गायकवाडी येथून तो आपल्या राहत्या घराकडे दुचाकीवरून (एमएच ०९ एएस २९५८) निघाला होता. त्याचवेळी आजरा तालुक्यातील धामणी येथील कृष्णा मुगळे हे आपल्या दुचाकीवरून (एमएच ०९ एके ५२८८) निपाणीकडून गायकवाडीकडे निघाले होते. देवचंद महाविद्यालयाच्या पुढील बाजूस दोन्ही दुचाकींची धडक होऊन हा अपघात झाला. त्यामध्ये दोघांनाही मोठी दुखापत झाली. मात्र निपाणी येथील युवक आकाश उर्फ अक्षय मातीवड्डर याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत्यू झाला. तर कृष्णा मुगळे हे गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ आरोग्यकवच वाहनातून उपचारासाठी नेले. त्यांच्यावर येथील महात्मा गांधी रुग्णालयात प्रथमोपचार करून अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात हलविण्यात आले.

घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक कृष्णवेणी गर्लहोसुर, हवालदार एस. एस. चिक्कोडी व सहका-यांनी भेट देऊन पंचनामा केला. या अपघाताची माहिती मिळताच मातीवड्डर कुटुंबीयांनी आक्रोश केला. रात्री उशिरा महात्मा गांधी रुग्णालयात शवविच्छेदन करून आकाशचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. यावेळी नगरसेवक विलास गाडीवड्डर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

मयत आकाश मातीवड्डर याच्या मागे आई, वडील, पत्नी व दोन मुली असा परिवार आहे. त्याची घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असून आकाशच्या अपघाती मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे. निपाणी शहर पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे.

वर्षभरात तिघांचा मृत्यू

मुधोळ-फोंडा या आंतरराज्य रस्त्याचे कर्नाटक हद्दीतील काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या रस्त्यावर वाहतूकीची वर्दळ वाढली आहे. बुधवारी झालेल्या अपघात स्थळ परिसरातच वर्षभरात तिघांचा अपघाती मृत्यू झाला आहे. तरी प्रशासनाने देवचंद महाविद्यालयापासून दोन्ही बाजूला पाचशे मीटरपर्यंत रबरी गतिरोधक बसविण्याची मागणी प्रवाशांतून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raosaheb Danve: महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाची चर्चा अन् रावसाहेब दानवेंची दिल्लीत धावपळ...नेमकं काय सुरू आहे?

Latest Marathi News Updates : नवाब मलिकांंना पराभूत केल्यानंतर 'सपा'चे आमदार अबू आझमी देवगिरीवर अजित पवारांच्या भेटीला

Eknath Shinde: ठाणे जिल्ह्याला हवा फुलटाइम ‘ठाणेदार’; कोणाला मिळणार संधी?

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! 'ट्रॅव्हल्स'च्या दरातच आता चक्क विमानप्रवास; 'या' कंपनीकडून संभाव्य दर प्रसिद्ध

मी पूर्ण प्रयत्न केले, तरी तू जाण्याचा निर्णय घेतलास...! Rishabh Pant ने दिल्लीची साथ सोडल्यानंतर मालक पार्थ जिंदाल स्पष्टच बोलले

SCROLL FOR NEXT