RPI president Ramdas Athawale esakal
पश्चिम महाराष्ट्र

Ramdas Athawale : गाव ढालेवाडी अन् मंत्रिपदाची सुसाट गाडी; सांगली जिल्ह्याचे सुपुत्र रामदास आठवले झाले पुन्हा केंद्रात मंत्री

केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांच्या रुपाने जिल्ह्याला पहिल्यांदा केंद्रात मंत्रिपद मिळाले.

सकाळ डिजिटल टीम

ढालेवाडी हे छोटेसे गाव ढालगावजवळ आहे. रामदास आठवले यांचे प्राथमिक शिक्षण ढालेवाडी प्राथमिक शाळेत झाले. सावळज (ता. तासगाव) हे त्यांचे आजोळ.

सांगली : लोकसभा निवडणुकीत (Sangli Lok Sabha Elections) त्यांच्या पक्षाला एकही जागा मिळाली नाही...एकही उमेदवार लढला नाही...त्यामुळे जिंकण्या-हरण्याचा प्रश्‍नच नव्हता...मात्र आज त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. सलग तिसऱ्यांदा ते केंद्रात मंत्री झाले. त्यांचे नाव रामदास बंडू आठवले (Ramdas Athawale)...त्यांचे गाव कवठेमहांकाळ तालुक्यातील ढालेवाडी. विखुरलेल्या, मागासलेल्या, रंजल्या-गांजल्या समाजाला आपल्या नेतृत्वाखाली एकत्र करण्याची क्षमता, हेच आठवले यांच्या या यशाचे गमक मानले जाते.

केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांच्या रुपाने जिल्ह्याला पहिल्यांदा केंद्रात मंत्रिपद मिळाले. त्यानंतर ‘दुष्काळ’ आहे, असे कुणी म्हणत असेल, तर ती चूक आहे. कारण, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (Republican Party of India) अध्यक्ष रामदास आठवले हे सांगली जिल्ह्याचे आहेत, त्यांची मुळे आजही ढालेवाडीत आहेत. मोलमजुरी करून जगणाऱ्या आठवले कुटुंबात जन्मलेल्या रामदास यांचा राजकीय व सामाजिक प्रवास थक्क करणारा आहे.

‘दलित पँथर’मधून त्यांचे नेतृत्व घडले. अनेक निवडणुकांत त्यांच्या पक्षाला प्रभावी यश मिळवता आले नाही, अनेकदा त्यांना जागावाटपात संधीही मिळाली नाही, मात्र त्यांना मानणाऱ्या वर्गाची बेरीज प्रभावी ठरत आली आहे. त्यामुळे त्यांचे मंत्रिमंडळातील स्थान पक्के राहिले आहे. एक राज्यमंत्रिपद सोडून बाकी वाटप होते, एवढा त्यांचा प्रभाव आहे.

सन २०१४ पर्यंत काँग्रेससमवेत त्यांची गट्टी होती, मात्र देशातील वारे बदलत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी भाजपचा हात धरला आणि भाजप-एनडीए सरकारमध्ये सलग तिसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली. सन १९९० ला ते पहिल्यांदा विधान परिषद सदस्य झाले. समवेतच त्यांना राज्यात मंत्रिपदाची संधी मिळाली. त्यांनी तीनवेळा लोकसभेची निवडणूक जिंकली. त्यानंतर ते राज्यसभेवर गेले. या लोकसभा निवडणुकीत विरोधी इंडिया आघाडीने दलित मतांवर प्रभाव पाडणारे मुद्दे प्रभावीपणे मांडले. अशा वेळी आठवले गटाची ताकद भाजप व एनडीएसमवेत होती.

ढालेवाडीत शिक्षण

ढालेवाडी हे छोटेसे गाव ढालगावजवळ आहे. रामदास आठवले यांचे प्राथमिक शिक्षण ढालेवाडी प्राथमिक शाळेत झाले. सावळज (ता. तासगाव) हे त्यांचे आजोळ. माध्यमिक शिक्षणासाठी ते आजोळी गेले. त्यांचे चुलते पोलिस दलात होते. त्यांनी रामदास यांना मुंबईला शिक्षणासाठी नेले. तेथे त्यांनी विधीचेही शिक्षण घेतले. रामदास लहान असतानाच त्यांचे वडील बंडू आठवले यांचे निधन झाले. आई मोलमजुरी करायची. राज्य सरकारमध्ये रामदास आठवले हे समाजकल्याणमंत्री झाले, तेव्हा आई बागेत काम करत होत्या. ही घटना राज्यभरात चर्चेचा विषय बनली होती. चार वर्षांपूर्वी आईचे निधन झाले. ढालेवाडीत त्यांनी बंगला बांधला आहे. आईचे स्मारक करण्याची त्यांची मनीषा आहे. त्यासाठी जागा घेतली आहे. शीघ्रकवी म्हणून ते लोकप्रिय आहेत. लोकसभेत ते भाषणातही व्यंगकविता सादर करत करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT