सकाळी 10 वाजता ग्राम पंचायत कार्यालयासमोर रयत संघटना व माजी सैनिक सदाशिव शेटके यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले.
कोगनोळी - हदनाळ येथील माजी सैनिक (Ex-Serviceman) सदाशिव शेटके (Sadashiv Netake) यांनी आप्पाचीवाडी येथील ग्राम पंचायतीकडून 2020-21 साली झालेल्या सर्व्हेमध्ये (Surbvey) हदनाळ येथील बोगस लाभार्थींच्या (Beneficiaries) नुकसानग्रस्त घराचा फोटो व माहिती मागितली होती. पण ग्रामपंचायतीकडून वेळकाढूपणा होत असल्याने ते सोमवारी (ता. 18) ग्रामपंचायत (Grampanchyat) कार्यालयासमोर उपोषणास (Fasting) बसले होते. मात्र आश्वासन मिळाल्याने उपोषण मागे घेतले असून न्याय न मिळाल्यास पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. या उपोषणास रयत संघटनेने पाठिंबा दिला होता.
सकाळी 10 वाजता ग्राम पंचायत कार्यालयासमोर रयत संघटना व माजी सैनिक सदाशिव शेटके यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. रयत संघटनेचे चिक्कोडी जिल्हा अध्यक्ष राजू पोवार व सहकाऱ्यांनी उपोषणस्थळी हजर राहून पाठिंबा दर्शविला. यावेळी त्यांच्या समवेत रयत संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
निपाणी ग्रामीण पोलिस ठाण्यातर्फे उपनिरीक्षक अनिल कुंभार यांनी मारहाण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. ग्रामविकासाधिकारी लक्ष्मण पारे यांनी फेर सर्व्हे करून बोगस लाभार्थींवर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेतले.
राजू पोवार म्हणाले, 2021-21 साली केलेल्या सर्व्हेमध्ये बोगस लाभार्थांची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी. माजी सैनिक सदाशिव शेटके यांना मारहाण केली आहे. त्यातील दोषींवर पोलिसांनी कारवाई करावी, अन्यथा पोलिस ठाण्यासमोर आंदोलन छेडण्यात येईल.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रमेश पाटील म्हणाले, ग्रामपंचायतीकडून चुकीचा सर्व्हे झाला असून यामध्ये अनेक अपात्र लोकांना निधी मिळाला आहे. त्यांची चौकशी करून शासनाचा निधी त्यांनी परत करावा.
यावेळी रयत संघटना निपाणी शहराध्यक्ष उमेश भारमल, तालुका सचिव कलगोंडा कोटगे, तालुका युवा अध्यक्ष बाळासो हादिकर, बाळकृष्ण पाटील, संतोष देसाई, नामदेव साळुंखे, नाना कुंभार, अशोक तोडकर, शिवाजी वाडेकर, संजय जोमा, संजय नाईक, विठ्ठल रजपूत, बाबासाहेब पाटील, गणपती चित्रे, तानाजी पाटील, भगवान गायकवाड, अभिनंदन चौगुले, बाळासो निपाणे यांच्यासह रयत संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.