कोल्हापूर : जिल्हा बॅंकेत अध्यक्ष म्हणून ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी आचारसंहिता घातली, म्हणूनच आज बॅंक देशात एक नंबरवर आहे. "आमचं ठरलंय' या पॅटर्नमध्ये ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे आहेतच, असा दावा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी आज केला. जिल्हा बॅंकेच्या वतीने श्री. मुश्रीफ यांच्यासह गृहराज्यमंत्री सतेज पाटील, वस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर व आमदार झालेल्या बॅंकेच्या संचालकांचा सत्कार खासदार प्रा. संजय मंडलिक यांच्या हस्ते झाला.
हे पण वाचा - ...त्यामुळे गहिवरले मंत्री हसन मुश्रीफ
सुरूवातीला माजी खासदार श्रीमती निवेदिता माने यांनी "आमचं ठरलंय' विषयाला हात घातला. त्या म्हणाल्या, ""जिल्ह्याला तीन मंत्रिपदे मिळाली हा दुर्धशर्करा योग आहे. श्री. मुश्रीफ श्रावणबाळ आहेत, चांगल्या कामामुळेच त्यांचा विधानसभेतील विजय सोपा झाला. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचे जे "आमचं ठरलंय' हे वाक्य राज्यभरात गाजले. त्यांच्या या वाक्यावर प्रश्नावली तयार होते, त्यांचे जे "ठरलंय' त्याला आमचीही साथ असेल.''
हे पण वाचा - धनंजय महाडिक यांनी दिल्या मंत्री मुश्रीफ यांना शुभेच्छा Video
गृहराज्यमंत्री सतेज पाटील म्हणाले, ""जिल्हा बॅंक ही मातृसंस्था आहे. जिल्ह्यातील सामान्यांच्या जीवनाशी निगडीत अर्थवाहिनीसाठी पुढील 20 वर्षाचे नियोजन करणे आवश्यक आहे. श्री. मुश्रीफ यांच्या नेतृत्त्वाखाली बॅंकेचे कामकाज चांगले सुरू आहे. सहा हजार कोटी रूपयांच्या ठेवीचे उद्दीष्ट बॅंक पूर्ण करेल.''
श्रीमती माने यांच्या भाषणाचा संदर्भ घेत श्री. पाटील म्हणाले, ""आमचं ठरलंय या पॅटर्नमध्ये ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे आहेतच.''
आमदार राजेश पाटील म्हणाले, ""जिल्हा बॅंकेत मला संचालक म्हणून घेतल्यानंतरच खऱ्या अर्थाने विधानसभेची संधी मिळाली. त्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला त्याला पात्र राहण्याचा मी प्रयत्न केला.'
हे पण वाचा - महाराष्ट्रातील नेते म्हणजे भुंकणारी कुत्री
आमदार राजू आवळे म्हणाले, ""पाच वर्षात भाजपच्या राजकारणाला जनता कंटाळली होती. शेतकऱ्यांत एकप्रकारची नाराजी होती, युवक बेरोजगार झाल्याने त्यांच्याही मनात रोष होता. याचा परिणाम निवडणुकीत दिसला.''
कार्यक्रमाला माजी आमदार संध्यादेवी कुपेकर, बाजार समिती सभापती दशरथ माने, शेतकरी संघाचे अध्यक्ष अमरसिंह माने, जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील, बॅंकेचे संचालक पी. जी. शिंदे, आर. के. पोवार, आसिफ फरास आदि उपस्थित होते. स्वागत बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांनी केले. प्रास्ताविक संचालक भैय्या माने यांनी केले. आभार संचालक बाबासाहेब पाटील-भुयेकर यांनी मानले.
"गोकुळ'वर बोलता बोलता..
श्री. मुश्रीफ हेही "गोकुळ'वर बोलता बोलता थांबले. जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने बोलताना बॅंकेपुर्वी "गोकुळ'ची निवडणूक आहे असे ते म्हणाले, पण तोपर्यंत खासदार प्रा. मंडलिक यांनी दुसराच मुद्दा उपस्थित केल्याने "गोकुळ'वर न बोलताच मुश्रीफ यांनी भाषण आवरते घेतले.
ना खाऊंगा, खाने दुँगा
गेली पाच वर्षे हुकुमशाही पद्धतीमुळे व्यथा कुणी मांडायच्या नाहीत, रस्त्यावर कोणी उतरायचे नाही अशी स्थिती होती. आता हे सरकार आपलं सरकार असल्याची भावना लोकांत आहे म्हणून शुभेच्छा देण्यासाठी लोकांची रांग लागली आहे. प्रलंबित प्रश्न तर पूर्ण करूच पण "ना खाऊँगा, ना खाने दुँगा' हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वाक्य पूर्ण करून दाखवू, असे आश्वासन श्री. मुश्रीफ यांनी दिले.
|