Ambabai Mandir Kolhapur esakal
कोल्हापूर

Ambabai Mandir : तब्बल साडेतेरा लाख भाविक अंबाबाई चरणी लीन; नवरात्रोत्सवात सेवाभक्तीत राबले शेकडो हात

Navratri Festival Kolhapur : मंदिर परिसरात कडेकोट सुरक्षा देताना पोलिस (Kolhapur Police) यंत्रणेनेही चोखपणे भूमिका बजावली.

सकाळ डिजिटल टीम

श्री महालक्ष्मी अन्नछत्र ट्रस्ट यांच्यातर्फे श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी मोफत अन्नछत्र चालविले जाते. यंदाच्या नवरात्रोत्सवात सुमारे एक लाख भाविकांनी अन्नछत्राचा लाभ घेतला.

कोल्हापूर : यंदाच्या नवरात्रोत्सवात (Navratri Festival) करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या (Ambabai) चरणी सुमारे १३ लाख ७० हजार १७७ भाविक लीन झाले. इतक्या मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांना सोयीसुविधा पुरविण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे पदाधिकारी, कर्मचारी सलग १६ ते १८ तास राबत होते. दिवसभर भाविकांना सुविधा देताना दर्शनरांग सुरळीत करणे, पाण्याची व्यवस्था पाहणे, चप्पल स्टँडवर देखरेख करणे, लाडू प्रसाद देणे, मंदिराच्या सुरक्षेवर लक्ष देणे व सायंकाळी पालखी सोहळ्यानंतर मंदिर परिसर स्वच्छ करणे, अशी जबाबदारी पेलत यंदाचा नवरात्रोत्सव उत्साहात साजरा होण्यासाठी प्रयत्नशील होते.

त्यासोबतच मंदिर परिसरात कडेकोट सुरक्षा देताना पोलिस (Kolhapur Police) यंत्रणेनेही चोखपणे भूमिका बजावली. गर्दीच्या ठिकाणी पोलिस कर्मचारी नेमण्यात आले होते. तसेच दक्षिण दरवाज्याजवळील पोलिस मदत केंद्राचा अनेक भाविकांना फायदा झाला. लाखोंच्या गर्दीत नातेवाईक तसेच सोबत असलेले सदस्य हरवल्यानंतर मदत केंद्राशी संपर्क साधल्यानंतर त्वरित हरवलेल्या व्यक्तीपर्यंत पोहोचता येणे शक्य झाले. दरवर्षीप्रमाणे यंदाही शारदीय नवरात्रोत्सवातील दहा दिवसांत व्हाईट आर्मीच्या वैद्यकीय कक्षाचा एक हजार ४२६ भाविकांनी लाभ घेतला.

आंबी टेक हेल्थकेअर यांच्यातर्फे मोफत बीपी व शुगर तपासणी करण्यात आली. या नियोजनासोबत मंदिरातील दर्शनरांग, पालखी सोहळ्यासाठी १०० जवान कार्यरत होते. दरम्यान, मंदिराच्या पश्चिम दरवाजा येथे देवस्थान समिती, हक्कदार श्रीपूजक मंडळ व व्हाईट आर्मी यांच्यातर्फे दहाही दिवस रक्तदान शिबिर घेण्यात आले. याचा समारोप शनिवारी (ता. १२) झाला.

यावेळी रक्तदान केलेल्‍या दिव्यांग व्यक्ती, तृतीतयपंथी, अनेक वेळा प्लेटलेटस् दान केलेले, दुर्मीळ रक्तगट असूनही रक्तदान केलेल्या रक्तदात्यांचा सत्कार करण्यात आला. आरोग्यमंत्री तानाजी सावंत, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, श्रीपूजक मंडळाचे अजित ठाणेकर, व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे यांच्या हस्ते सत्कार सोहळा झाला. यावेळी राहुल गोखले, उमेश उकुंडे, अभिजित बुधले, शैलेश बांदेकर, उदय पवार, राजेंद्र मांगुरे, अनीष पोतदार, धनंजय नामजोशी, कोमल बडसकर, संतोष पाटील, विदुला नीलकंठ यांचा सत्कार करण्‍यात आला.

‘सेवा हीच भक्ती’चा संदेश

अंबाबाई मंदिरात पहाटेपासूनच देवीसोबत भाविकांच्या सेवेत हजारो हात राबत होते. अनिरुद्ध फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी शिस्तीचे दर्शन घडवत दर्शनरांगेचे चोख नियोजन केले. आम्ही आनंदयात्री, मानवसेवा, अंबाबाई फक्त मंडळ ट्रस्ट, महाव्दार रोड व्यापारी असोसिएशन या संस्थांनी भाविकांना प्रसाद वाटप, पोलिस व देवस्थानच्या कर्मचाऱ्यांना मदत, चहा वाटप, भाविकांना तातडीने उपचाराची सोय, अन्नछत्राची सोय देत देवीसोबतच भाविकांचीही सेवा करत ‘सेवा हीच भक्ती’ असा संदेश दिला.

श्री महालक्ष्मी अन्नछत्र ट्रस्ट यांच्यातर्फे श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी मोफत अन्नछत्र चालविले जाते. यंदाच्या नवरात्रोत्सवात सुमारे एक लाख भाविकांनी अन्नछत्राचा लाभ घेतला. संभाव्य गर्दी लक्षात घेऊन अन्नछत्राची वेळ वाढवून सकाळी ११ ते दुपारी चार अशी करण्यात आली होती. यासाठी ७५ कर्मचारी कार्यरत होते. या सर्व व्यवस्थेचे नियोजन संस्थेचे अध्यक्ष राजू मेवेकरी यांनी केले. त्यांना एस. के. कुलकर्णी, संजय जोशी, राजेश सुगंधी, ॲड. तन्मय मेवेकरी, आदित्य मेवेकरी, प्रशांत तहसीलदार, चंद्रशेखर घोरपडे, सुनील खडके, ऋतुराज सरनोबत, प्रथमेश कुलकर्णी यांचे सहकार्य लाभले.

सीसीटीव्ही कॅमेरे, बंदोबस्तामुळे चोरीच्या घटनांना आळा

दरवर्षी गर्दीचा फायदा घेऊन काही खिसेकापू, चोरटे भाविकांचे मोबाईल, महिलांचे दागिने चोरतात. या बाबींवर नियंत्रण मिळविण्यासाठी यंदा दर्शन रांग व परिसरात सुमारे १२० सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते. तसेच गणपती चौकातील मुखदर्शनावेळी गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रथमच ‘ए आय’चा वापर करून फिश आय व फेस कॅप्चरिंग कॅमेरे बसविण्यात आले होते. याचा परिणाम म्हणून मंदिर परिसरात एकही चोरीची घटना घडली नाही. मुखदर्शनाचे व्यवस्थापन चोख करता आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT