‘जोतिबा आणि अंबाबाई तीर्थक्षेत्रांचा विकास झाल्यावर आता येणाऱ्या भाविकांमध्ये १० पटीने वाढ होईल.'
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवस्थान (Ambabai Temple) परिसर विकास आराखडा तयार झाला आहे. आज नियोजन समितीच्या बैठकीत वास्तुविशारद सुनील पाटील यांनी आराखड्याचे सादरीकरण केले. या आरखड्यासाठी २७५ कोटींचा निधी प्रस्तावित आहे. हा आराखडा ४.५ हेक्टर एवढ्या जागेत होणार असून, त्यामध्ये इमारती, पार्किंग, दर्शनमंडप, हेरीटेज हॉल यासह विविध सोयी-सुविधा देण्यात आल्या आहेत.
अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून भाविक कोल्हापुरात येतात. त्यांना चांगल्या सोयी-सुविधा उपलब्ध झाल्या तर भाविकांची संख्या आणखी वाढेल. त्यातून शहरातील आर्थिक उलाढाल वाढेल. यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि जिल्हाधिकारी राहुल रेखावार (Collector Rahul Rekhawar) यांच्या कल्पकतेतून श्री करवीर निवासिनी अंबाबाई देवस्थान परिसर विकास आराखडा बनवण्यात आला आहे. यासाठी मंदिर परिसरातील इमारती, घरे संपादित करण्यात येतील. त्यानंतर सुमारे ४.५ हेक्टर एवढ्या क्षेत्राचा विकास करण्यात येईल.
याबाबत पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, ‘जोतिबा आणि अंबाबाई तीर्थक्षेत्रांचा विकास झाल्यावर आता येणाऱ्या भाविकांमध्ये १० पटीने वाढ होईल. त्यामुळे जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायालाही चालना मिळेल. यासाठी हे दोन्ही आराखडे राज्य शासनाला सादर करून निधीची उपलब्धता करून दिली जाईल. लवकरात लवकर या विकासकामांना सुरुवात करण्यात येईल.’
३३० चारचाकी वाहने, ६५० दुचाकी वाहने, ७ बस आणि ३ मिनी बसची क्षमता असणारे पार्किंग स्लॉट.
१६२ दुकाने आणि खाद्य पदार्थांचे स्टॉल.
५ हजार आसन क्षमता असणारा दर्शनमंडप.
४४ स्वच्छतागृहे.
भाविकांना त्यांचे साहित्य ठेवण्यासाठी सुरक्षित लॉकर.
विविध सण, उत्सव साजरे करण्यासाठी स्वतंत्र सभागृह (ॲम्पी थिएटर)
लाईट अँड साउंड शो सादर करण्यासाठी भवानी मंडपात हेरीटेज प्लाझा.
प्रदर्शनासाठी सभागृह.
हेरीटेज पॅव्हीलियन.
बिनखांबी मंदिर आणि अन्य परिसरात जाण्यासाठी स्वतंत्र व सुरक्षित मार्ग.
वेद पाठशाळा आणि अन्नछत्रासाठी इमारत.
पुरातत्त्व यादीमधील मंदिरे, इमारती यांचे संवर्धन.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.