Chandgad Taluka Kowad Police esakal
कोल्हापूर

Gold Jewelry : चंदगड तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ; 36 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह 18 लाखांचा ऐवज चोरीस

सकाळ डिजिटल टीम

चोरट्यांनी कपाटातील सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याने भोगण कुटुंबीयांना याचा धक्काच बसला आहे.

कोवाड : कागणी, तेऊरवाडी व कोवाड (ता. चंदगड) येथे बुधवारी भर दुपारी चोरट्यांनी धुमाकूळ घातला. चोरट्यांनी घरफोड्या करत तब्बल ३६ तोळे सोने, अर्धा किलो चांदीसह (Gold, Silver) व एक लाख ३५ हजार रुपयांची रोकड चोरली. या सर्व ऐवजाची अंदाजे किंमत १८ लाख ४० हजार रुपये होते. या तीन गावांत सात ठिकाणी दुपारी १२ च्या सुमारास या घरफोड्या झाल्या. कोवाड पोलिसांनी (Kowad Police) घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी : कागणी येथे कोवाड ते बेळगाव (Belgaum) रस्त्यालगत असलेल्या लक्ष्मण सटूप्पा भोगण व जोतिबा भरमू बाचूळकर यांच्या घरांचे कुलूप चोरट्यांनी तोडले. भोगण यांच्या घरातील सर्वजण सकाळी शेताकडे गेले होते. चोरट्यांनी घरातील लोखंडी कपाटाचे कुलूप तोडून अंदाजे १५.५ तोळे सोन्याचे दागिने चोरले. यामध्ये भोगण यांचे पाच तोळे व त्यांची मुलगी मनीषा रामलिंग पाटील यांचे साडेदहा तोळ्यांचे सोन्याचे दागिने होते. चोरट्यांनी खोलीतील दुसऱ्या कपाटाचे हॅंडल तोडून चोरीचा प्रयत्न केला.

बसस्टॉपशेजारी असलेल्या बाचूळकर यांच्या घराच्या पुढील दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी लोखंडी कपाटातील गंठण, नेकलेस अंगठ्या, चांदीचे दागिने, कर्णफुले, कुडेझुबे असे १०.३ तोळ्यांचे सोन्याचे दागिने, अर्धा किलो चांदीचे दागिने व रोख ६० हजार रुपये चोरले. कोवाड येथील नेसरी रोडवरील हॉटेल व्यावसायिक श्रीकांत निंगाप्पा पाटील यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सात तोळ्यांचे सोन्याचे दागिने व ६५ हजार रुपये रोख रक्कम चोरली. शेजारील उदय पाटील यांच्या घराचा फक्त कुलूप तोडण्याचा प्रयत्न झाला.

त्यानंतर चोरट्यांनी सुभाष नारायण अतिवाडकर यांच्या घराकडे मोर्चा वळविला. त्यांच्या घराचा लोखंडी व मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. लोखंडी कपाटातील चार तोळे सोन्याचे दागिने चोरुन नेले. जानबा अस्वले यांच्या घराचा दरवाजा तोडला; पण त्यांना काहीही हाताला लागले नाही. त्यानंतर चोरट्यांनी तेऊरवाडी येथील सुशीला यशवंत पाटील व कमळाबाई दत्तू पाटील यांच्या घरीतही चोरी केली. कमळाबाई यांच्या घरातून रोख दहा हजार रुपये चोरले.

मुख्य मार्गावर श्वान घुटमळले

सायंकाळी कोल्हापूरहून श्वासनपथक व ठसे तज्ज्ञांचे पथक दाखल झाले होते. पथकातील श्वानने कागणी व कोवाड या दोन्ही ठिकाणी मुख्य रस्त्यापर्यंत माग दाखविला. यावरुन चोरटे वाहनातून पसार झाल्याचा अंदाज आहे. रात्री उशिरापर्यंत या घटनेच्या नोंदीचे काम सुरू होते. पोलिस उपनिरीक्षक एच. एस. नाईक तपास करीत आहेत.

एका मार्गावर चोरी

तेऊरवाडी ते कागणीपर्यंत एकाच रस्त्यावरील घरातून चोरट्यांनी कार्यभाग साधला आहे. त्यामुळे कोवाड बाजारपेठेतून त्यांचा वावर झाल्याचा अंदाज आहे. त्याअनुषंगाने पोलिसांनी रस्त्यावरील काही दुकानांतील सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेतला असला तरी चोरट्यांचा कोणताच सुगावा हाती लागला नाही.

दागिने वडिलांकडे ठेवले अन्..

लक्ष्मण भोगण यांच्या मुलीने बाहेरगावी जाणार असल्याने आपले दागिने वडिलांकडे ठेवले होते. आज चोरट्यांनी कपाटातील याच सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याने भोगण कुटुंबीयांना याचा धक्काच बसला आहे.

बंद घरे हेरून लूट

चोरट्यांनी बंद घरांना लक्ष करून घरफोडी केली. कडी-कोयंडा उचकटून व कुलूप तोडून घरात प्रवेश करण्याची सर्वच एकच पध्दत चोरट्यांची वापरली आहे. यावरून चोरटे सराईत असल्याची चर्चा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT