Kolhapur News sakal
कोल्हापूर

Kolhapur News : प्रवासी फेऱ्यांची हमी,मात्र बसेस कमी ; मलकापूर आगारातील चित्र,पाच वर्षांपासून कारभार ३९ बसेसवरच

सकाळ वृत्तसेवा

शाहूवाडी तालुक्यातील दळणवळण व्यवस्थेत महत्त्वाची भूमिका असणारी महाराष्ट्राची लालपरी म्हणून संबोधली जाणारी एसटी बसची दमछाक होताना दिसत आहे. नादुरुस्त बसेस प्रवासाचा अडथळा, सुस्थितीतील बसेसची कमतरता, वाहक व चालकांसह प्रवाशांचा जीव टांगणीला अशा अनेक समस्यांसह ‘एसटीचा प्रवास - सुखाचा प्रवास’ म्हणत न थकता जड पावलांनी सुरू असलेली दिनचर्येविषयी वृत्तमालिका...

बांबवडे : शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर आगारात ३९ बस गाड्या उपलब्ध आहेत. यात एक गाडी देखभालीसाठी रोज ठेवावी लागते. त्यामुळे प्रत्यक्ष प्रवासासाठी ३८ गाड्या धावतात. पाच वर्षांपासून यात काहीच बदल नाही. लोकसंख्येच्या तुलनेत प्रवासीसंख्या वाढली असली तरीही गाड्यांची संख्या वाढण्याऐवजी कमी झालेली दिसत आहे.

शाहूवाडी तालुक्यातील मागील काळातील सावर्डे, उदगिरी, कोकरुड, साळशी, विशाळगड, बुरंबाळ,करंजफेण या सात, तर तालुक्यात बाहेरील कोल्हापूर, अक्कलकोट, गाणगापूर, पुणे प्रत्येकी दोन, सातारा दोन, तर मुंबईसाठी आठ अशा पंधरा मुक्कामी गाड्या यायच्या; पण अलीकडे मुक्कामी गाड्यांचे मार्ग बंद केले आहेत. त्यामुळे मिळणारे उत्पन्न कायमचे बंद झाले आहे. शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर आगारास अजून २० ते २२ गाड्या उपलब्ध झाल्या, तर उत्पन्न वाढेलच; पण लोकांची प्रवासाची अडचणही दूर होईल.

पर्यटनदृष्ट्या नियोजन आवश्यक

शाहूवाडी तालुक्यातील विशाळगड, उदगिरी, धोपेश्वर येळवण जुगाई ही धार्मिक स्थळे पर्यटनदृष्ट्या प्रसिध्द आहेत. तेथे गाड्यांच्या फेऱ्यांचे नियोजन करणे महत्त्वाचे आहे. पंढरपूर, इचलकरंजी, अक्कलकोट, वाठार, इस्लामपूर येथे जाणाऱ्या गाड्यांच्या फेऱ्या वाढवल्यास उत्पन्न वाढेल. पुणे, मुंबईला सुटीच्या काळात हंगामी फेऱ्या व पर्यटनासाठी फेऱ्यांचे योग्य नियोजन झाले तर अतिरिक्त उत्पन्न वाढेल.

शालेय सहलीसाठी सुरक्षित; पण...

तालुक्यात परखंदळे, सावे, पाटणे, पिशवी अशा गावांना अदलाबदल करत बांबवडे व मलकापूरला फेरी करण्यासाठी प्रयत्न गरजेचा आहे. शालेय सहलींसाठी सुस्थितीतील व आकर्षक गाड्यांची कमतरता असल्याने शालेय सहलीला खासगी गाड्यांचा पर्यायी वापर वाढला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

नियुक्ती वाहक, काम नियंत्रक

रिक्त पदांवर तडजोड करून काम करावे लागत असल्याने कामाचा ताण कर्मचाऱ्यांवर पडत आहे. सध्या तीन ठिकाणी वाहकांना नियंत्रक म्हणून काम करावे लागत आहे; तर पगार मात्र वाहकाचा मिळत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT