5 crore rupees budget received for shivaji university for research in kolhapur 
कोल्हापूर

Good News : संशोधनासाठी शिवाजी विद्यापीठाला मिळणार पाच कोटी

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाच्या ‘बिल्डर’ (बूस्ट टू युनिव्हर्सिटी इंटरडिसिप्लिनरी लाइफ सायन्स डिपार्टमेंट्‌स फॉर एज्युकेशन अँड रिसर्च प्रोग्राम) योजनेंतर्गत शिवाजी विद्यापीठाला संशोधनासाठी पाच कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या योजनेअंतर्गत निधी प्राप्त करणारे विद्यापीठ राज्यातील एकमेव आहे.

विद्यापीठाचे प्र-कुलगुरू व प्रकल्पाचे समन्वयक डॉ. पी. एस. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, जैवविज्ञानातील विविध शाखांनी एकत्रित येऊन संयुक्त प्रकल्प करावेत व त्यातून भरीव संशोधन आकाराला यावे, असा योजनेचा हेतू आहे.

विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र, नॅनोसायन्स व तंत्रज्ञान आणि बायोइन्फॉर्मेटिक्‍स विद्याशाखांनी सूक्ष्म सजीवांपासून उपयुक्त नॅनो कणांच्या निर्मितीचा प्रकल्प सादर केला. हा पंचवार्षिक प्रकल्प मंजूर होऊन त्यासाठी पाच कोटींचा निधी प्राप्त होणार आहे. तो उपयुक्त, आधुनिक सामग्री व उपकरणे घेण्यासाठी वापरता येणार आहे.

कसा असेल प्रकल्प ?

प्रकल्पांतर्गत नॅनोसायन्स व तंत्रज्ञान विभागाचे डॉ. किरण पवार, सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे डॉ. के. डी. सोनवणे, वनस्पतीशास्त्र विभागाचे डॉ. एम. एस. निंबाळकर आदी संशोधक काम करणार आहेत. डॉ. पवार विविध धातूंचे, विविध आकाराचे नॅनोपार्टीकल्स तयार करणे व त्यांचे भौतिक गुणधर्म तपासणे याविषयी संशोधन करतील. डॉ. निंबाळकर संशोधन व विकासाच्या जबाबदारी बरोबरच विविध जीवाणू, विषाणू, वनस्पती व कवक यांच्यामधील नॅनोतंत्रज्ञानाला उपयुक्ततेबाबत संशोधन करतील. पश्‍चिम घाटातील विविध वनस्पतींचा नॅनोपार्टीकल तयार करण्यासाठी आणि त्यांच्या औषधी व शेतीपूरक वापराबाबतही संशोधन करतील. डॉ. सोनवणे बायोइन्फॉर्मेटिक्‍स तंत्रज्ञानाच्या साह्याने नॅनोकण व नॅनो मटेरिअल यांचे सिंथेसिस करतील आणि नॅनोपार्टीकल्सचा सजीव पेशींत होणाऱ्या परिणामांविषयी चाचण्या करतील.

संशोधनाचे महत्त्व 

संशोधनामुळे विविध सजीवांचा उपयुक्त नॅनोकण निर्मिती करण्यासाठीच्या उपयोजनांबाबत भरीव माहिती मिळेल. नॅनोकण बनविणाऱ्या जीवाणूंचा शोध, नॅनोकण व नॅनो-मटेरिअलचा कर्करोग, न्यूरोसायन्स, अल्झायमर (स्मृतिभ्रंश), टारगेटेड ड्रग डिलीव्हरी व रिलीज, कृषी क्षेत्रासाठी उपयुक्त नॅनोमटेरिअल, नॅनो पेस्टीसाईड आदी अनुषंगानेही संशोधन केंद्रित असेल. याबरोबरच नॅनो तंत्रज्ञानाला पूरक स्वरूपाचे अध्ययन, अध्यापन आणि त्यासंदर्भातील संशोधनासाठी लागणारे प्रशिक्षण, कार्यशाळा, वेबिनार, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांचे आयोजन यांचाही या प्रकल्पात अंतर्भाव आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly: आला, आला, आला...पाटील आला! सरकार कुणाचेही असो; रुबाब 'पाटलां'चाच! राज्यातून २४ 'पाटील' पोहोचले विधानसभेत

IND vs AUS 2nd Test: रोहित आला पण... टीम इंडियाचा युवा फलंदाज दुसऱ्या कसोटीला मुकणार, दुखापतीचे ग्रहण

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टीची सपाट सुरुवात; मिडकॅप शेअर्समध्ये खरेदी, अदानी समूहाचे शेअर्स कोसळले

Karad Accident : मलकापुरात दुचाकीच्या धडकेत तरुण ठार; कुटुंबीयांच्या डोळ्यासमोरच अपघात

Bike Accident : भरधाव टेम्पोच्या धडकेत शरद पवार गटाचे शहराध्यक्ष जागीच ठार; डोक्याला गंभीर मार लागला अन्..

SCROLL FOR NEXT