कोल्हापूर: कोल्हापूर (Kolhapur Lockdown) जिल्हात दहा दिवसांचा कडक लाॅकडाऊन करण्यात केला असून नागरिकांना विनाकारण बाहेर न पडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवेसह दूध, भाजीपाला हे घरपोच मिळेल असा आदेश काढण्यात आला आहे. मात्र काही नागरिक मॉर्निंग वॉकला (Morning walk)जाण्याचे टाळत नाहीत. वॉकला जाताना काहींच्या तोंडाला मास्क नसतो. शहरात सगळीकडेच पोलिसांचे लक्ष असून विनाकारण फिरणाऱ्यांवर आता पोलिसांची करडी नजर आहे.
A fine of Rs 500 imposed on 25 people came for a morning walk on Airport Road kolhapur marathi news
आज सकाळी विमानतळ रोडवर अशाच 25 जणांवर कारवाई करण्यात आली. आणि प्रत्येकांकडून पाचशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.यामध्ये उजळाईवाडी विमानतळ रोडवर सकाळी गोकुळ शिरगाव पोलिसांनी लॉकडाऊन आदेशाचा भंग करुन मॉर्निंग वॉकला आलेल्या सुमारे २५ जणांवर कारवाई केली. प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड केला. डीवायएसपी आर आर पाटील, सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रवीण पाटील , पीएसआय रविकांत गच्चे व त्यांचे सहाकार्ऱ्यानी ही कारवाई केली. उजळाईवाडी तंटामुक्ती समिती अध्यक्ष सचिन पाटील यांची उपस्थिती होती.
A fine of Rs 500 imposed on 25 people came for a morning walk on Airport Road kolhapur marathi news
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.