कोल्हापूर

सूर्यकांत मांडरेंचं कोल्हापूरच्या मातीशी घट्ट नातं; स्वरुपा पोरेंनी उलगडला 'जीवन प्रवास'!

अर्चना बनगे

कोल्हापूर: कोल्हापूर (Kolhapur)म्हणजे कलेचे माहेरघर. राजकीय ,सांस्कृतिक, शैक्षणिक वारसा लाभलेला महत्त्वाचा जिल्हा. या जिल्ह्यातून अनेक कलाकार दिग्दर्शक तसेच उद्योजक संशोधक घडून गेले. शाहूंच्या या भूमीत कलेला खूप मोठे आश्रयस्थान आहे. या भूमीने अनेक कलाकार जन्माला घातले त्यातलीच एक अष्टपैलू कलाकार म्हणजे सुर्यकांत मांडरे.(Suryakant Mandare) बलदंड, उंचापुरे असे व्यक्तिमत्व असणारा,मराठी चित्रपट सृष्टीला पाटील या नावाचा खंबीर नेतृत्व असणारा,नाट्य, चित्रपट, अभिनेते ,लेखक ,चित्रकार, शिल्पकार, निर्माता-दिग्दर्शक आणि ग्रामीण चित्रपटाचे समर्थपणे भूमिका   वठवणारे सूर्यकांत मांडरे यांची आज जयंती. सूर्यकांत मांडरे आणि कोल्हापूर यांचं काय नातं होतं आणि त्यांचा जीवन प्रवास या विषयी त्यांची नात स्वरुपा पोरे (Swarupa Pore)यांच्याकडून आपण मांढरे यांच्या विषयी जाणून घेतले त्याचा हा आढावा. काय म्हणाल्या आपल्या आजोबांविषयी जाणून घेऊया.actor-suryakant-Mandare -jayanti-special-kolhapur-and-mandhare-relation-kolhapur-news

कोल्हापूर आणि सूर्यकांत मांडरे यांचे एक अनोखे नाते आहे. मुळात त्यांचा जन्मच कोल्हापूरचा. त्यांचे पूर्ण नाव वामन तुकाराम मांडरे. 1925 मध्ये तानुबाई आणि तुकाराम मांडरे या दांपत्याच्या पोटी त्यांचा जन्म झाला. त्यांचे शिक्षण कोल्हापुरातील सरस्वती विद्यालय आणि हरिहर विद्यालयात पार पडले.  बाबा गजबर या चित्रकारांकडून ते चित्रकलेचे धडे घेत होते.लहानपणापासून व्यायामाची आवड असणाऱ्या मांडरे यांनी तालमीत आपले शरीर बलदंड बनवले होते. ते आकर्षक दिसत होते.त्यांचे हेच आकर्षक रूप भालजी पेंढारकर यांच्या नजरेला पडले आणि वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी 1938 मध्ये ध्रुव या चित्रपटात काम करायची संधी दिली.

अशी झाली चित्रपटाची सुरुवात

सूर्यकांत मांडरे यांनी शाळेपासून ॲक्टींग करण्यास सुरुवात केली. शाळेमध्ये असताना त्यांनी अनेक रोल निभावले यामध्ये शाळेमध्ये त्यांना निगेटिव्ह रोल अशी भूमिका देण्यात येत होती. त्यांना लहान असताना दोन गुरूंचे मार्गदर्शन लाभले. एक म्हणजे भालजी पेंढारकर आणि दुसरे म्हणजे बाबा गजबर. एकांकडे चित्रकलेचे ज्ञान मिळवले तर दुसऱ्यां कडे चित्रपट सृष्टीचे ज्ञान मिळाले.शालेय शिक्षण घेत असताना सूर्यकांत मांडरे हे चित्रकला आणि अभिनय यांच्याकडे त्यांची वाटचाल होती. 1943 मध्ये त्यांनी बहिर्जी नाईक या भालजी पेंढारकर दिग्दर्शित चित्रपटात बाल शिवाजी महाराजांची भूमिका केली. हा चित्रपट त्याकाळी खूप गाजला आणि यावरूनच भालजी पेंढारकर यांनी सूर्यकांत नाव ठेवले.तिथून पुढच्या सगळ्या चित्रपटांमध्ये सूर्यकांत या नावानेच ते पडद्यावर झळकू लागले.

चित्रपटाची वाटचाल

सूर्यकांत मांढरे यांनी 100 हून अधिक चित्रपटात काम केले आहे. केतकीच्या बनात, स्त्री जन्मा तुझी कहाणी, ग्रह देवता, बाळा जो जो रे या चित्रपटात नायक ही सुरेख पणे उभे केले.त्यांची पडद्यावरची जयश्री गडकर या अभिनेत्रीबरोबर जमलेली जोडी अतिशय लोकप्रिय ठरली. या जोडीने 70 चित्रपटात एकत्र काम केले. त्याचबरोबर सुलोचना आणि उषा किरण यांच्याबरोबरही त्यांचे अनेक चित्रपट गाजले. चित्रपटाबरोबरच अनेक नाटकात त्यांनी काम केले.आग्र्याहून सुटका ,तुझे आहे तुजपाशी ,लग्नाची बेडी ,झुंजारराव, बेबंदशाही अशी ही त्यांची गाजलेली नाटकं.

कौटुंबिक सलोखा

सूर्यकांत मांडरे एक उत्तम अभिनेते होते. त्याचबरोबर त्यांनी कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीशी त्यांनी आपले नाते घट्ट बनवले होते. त्यांची नात स्वरूपा पोरे यांनी त्यांच्याशी भरभरून सांगितलं. त्या म्हणाल्या, माझे पपाजी हे घरातील प्रत्येक व्यक्तींशी त्या त्या वयात जाऊन वागायचे. त्यांनी कधीही अभिनेता आणि कुटुंब एकत्र नाही केले. घरी ते एक सर्वसामान्य इतर कुटुंबातील व्यक्ती सारखेच वावरायचे. एक मोठा अभिनेता असे त्यांनी कधीच अविर्भाव आणला नाही. त्यांचा खूप मोठा मित्रपरिवार कुटुंब परिवार आहे. पेन्सिल कशी धरायची इथपासून घरी नातवंडांना शिक्षण दिलं. त्यांना पुस्तक लिहायचा छंद होता. चित्र काढायचा छंद होता. सामाजिक कार्यात सक्रिय असायचे. त्यांनी कधीही जाणवू दिले नाही कि कुटुंब आणि चित्रपट दोन्ही एक आहेत.

सामाजिक कामात सूर्यकांत मांडरे यांचे कोल्हापूरच्या चित्रनगरीच्या उभारणीतही खूप मोठे योगदान आहे. चित्रपटसृष्टीशी त्यांचा संबंध अधिक असल्यामुळे चित्रपट क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले.कोल्हापुरात राजारामपूरी 7 वी गल्लीमध्ये निसर्ग संग्राहलयात चंद्नकांत मांडरे यांच्या चित्रांचे दालन आपल्याला पाहायला मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena Leader: मोठी बातमी! शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड; मुख्यमंत्री कोण होणार?

IPL 2025 Auction Live: जोफ्रा आर्चर पुन्हा राजस्थान संघात, तर Mumbai Indiansने सर्वात पहिल्यांदा खरेदी केला 'हा' खेळाडू

Ashok Chavhan : ज्यांनी ज्यांनी मला त्रास दिला.....अशोक चव्हाण यांची बाळासाहेब थोरात आणि देशमुखांवर खोचक टीका

Sangamner Result: संगमनेरमध्ये पराभवाचा बदला पराभवानेच! ४० वर्षांची कारकीर्द ४१ वर्षांच्या तरुणाने संपवली; नेमकं काय घडलं?

Zimbabwe beat Pakistan: यांना झिम्बाब्वेने हरवले... पाकिस्तानचे ६ फलंदाज ६० धावांत तंबूत, मोहम्मद रिझवाच्या संघाची गेली लाज

SCROLL FOR NEXT