admission process for the college coming under Rani Channama University will start from August  
कोल्हापूर

राणी चन्नमा विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया 'या' तारखेला होणार सुरु...

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव - राणी चन्नमा विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया 1 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. तिसऱ्या आणि पाचव्या सेमीस्टरचे वर्ग 1 ऑगस्टपासून तर पहिल्या सेमीस्टरचे वर्ग 1 सप्टेंबरपासून सुरु होणार आहेत. यासंबंधी विद्यापीठाने एक प्रसिद्धी पत्रक काढून महाविद्यालयांना सूचना केल्या आहेत. 

कोरोनामुळे मार्च महिन्यांपासून महाविद्यालये बंदच आहेत. राज्य सरकारने अंतीम वर्ष वगळता सर्व परीक्षा रद्द केल्या आहेत. मात्र, महाविद्यालय कधी सुरु होणार याची आस विद्यार्थ्यांना लागून होती. मात्र, विद्यापीठाने प्रवेश प्रक्रिया, पुढील परीक्षा आदींच्या तारखा जाहीर केल्या आहेत. तसेच या तारखांमध्ये बदल होण्याची शक्‍यताही वर्तविली आहे. 

प्रथम सेमिस्टरमध्ये दंडाविना 28 ऑगस्टपर्यंत प्रवेश घेऊ शकता. विद्यापीठाकडे चलन व डीडीद्वारे 31 ऑगस्टपर्यंत शुल्क भरणा करावा. दंडासहीत प्रवेश घेण्यासाठी 7 सप्टेंबर ही अंतीम तारीख असेल. पहिल्या सेमिस्टरसाठी प्रवेश घेतलेल्यांच्या नावात बदल व दुरुस्तीसाठी 19 ऑक्‍टोंबर ही अंतीम तारीख आहे. तसेच पहिल्या सेमिस्टरचे वर्ग 29 डिसेंबरपर्यंत चालतील. 

तिसऱ्या आणि पाचव्या सेमिस्टरसाठी दंडाविना 14 ऑगस्टपर्यंत प्रवेश तारीख देण्यात आली आहे. चलन किंवा डीडीद्वारे विद्यापीठाकडे 17 ऑगस्टपर्यंत शुल्क भरू शकता. दंडासह 24 ऑगस्टपर्यंत प्रवेश घेता येणार आहे. पहिल्या, तिसऱ्या पाचव्या सेमिस्टरची मध्यांतर सुट्टी, परीक्षा, मुल्यमापन व निकाल 14 डिसेंबर ते 25 जानेवारीपर्यत जाहीर करण्यात येतील. 

दुसऱ्या, चौथ्या व सहाव्या सेमीस्टरचे वर्ग 27 जानेवारीपासून सुरु होणार आहेत. यांचा शेवटचा वर्ग 26 मे रोजी होणार आहे. दुसऱ्या, चौथ्या आणि सहाव्या सेमीस्टरच्या विद्यार्थ्यांची सुट्टी, परीक्षा, मुल्यमापन, निकाल 27 मे ते 12 जुलै दरम्यान जाहीर करण्यात येईल. 2021-22 शैक्षणिक वर्षात पहिल्या, तिसऱ्या व पाचव्या सेमिस्टरचे वर्ग 15 जुलै पासून सुरु होतील. असे पत्रकात नमुद केले आहेत. तसेच या या यादीत बदलही होऊ शकतो, असेही म्हटले आहे. 

संपादन - मतीन शेख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण सुरू, 'अदृश्य' शक्तीने कारस्थान रचून दोन पक्ष फोडले; सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्ला

Latest Maharashtra News Updates : विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का घसरू नये म्हणून केंद्राचा निर्णय

Mahadev Jankar: “मुख्यमंत्र्यानी नाही, पण पंतप्रधान नक्की होणार”; जानकरांनी व्यक्त केला विश्वास

Patanjali Owner: ना बाबा रामदेव, ना आचार्य बाळकृष्ण... 67,535 कोटी रुपयांच्या पतंजलीचा खरा मालक कोण?

Chitra Wagh: लाडकी बहीण योजना कर्नाटकाच्या गृहलक्ष्मी योजनेपेक्षा सरस, चित्रा वाघ यांचं वक्तव्य

SCROLL FOR NEXT