Ajit Pawar Jan Swarajya Yatra  esakal
कोल्हापूर

Ajit Pawar: मुख्यमंत्री पहाटे 4 वाजेपर्यंत ते उपमुख्यमंत्री सकाळी 5 पासून करतात काम... अशी आहे एकनाथ शिंदे अन् अजितदादांची शिफ्ट

Sandip Kapde

कोल्हापूर शहरात आज झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. त्यांनी केशवराव नाट्यगृहाला लागलेल्या आगीबद्दल दुःख व्यक्त केलं. "या घटनेमुळे सांस्कृतिक ठेवा नष्ट झाला आहे. माझ्यासारख्या असंख्य लोकांना या वास्तूबदल आदर होता," असं त्यांनी सांगितलं. पवार यांनी वचन दिलं की हे नाट्यगृह पुन्हा उभारणार आणि आवश्यक निधी देणार.

जनसन्मान यात्रा आणि इचलकरंजी मेळावा-

अजित पवार यांनी जनसन्मान यात्रेतील इचलकरंजी मेळाव्यात महिलांची उपस्थिती लक्षनीय असल्याचं सांगितलं. "जनतेसमोर जात असताना विकासकामे समोर ठेवून जावा, मागे काय घडलं यावर टीका करण्याची गरज नाही," असं ते म्हणाले. त्यांनी महिलां जिल्हाध्यक्ष शीतल फराकटे यांना शेलक्या शब्दात सुनावले.

विरोधकांवर टीका-

"विरोधक खोटा प्रचार करून नेरीटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतात. कोणत्याही निवडणुकीत अपयश आले म्हणून खचून जाऊ नका आणि यश आले म्हणून हरळून जाऊ नका," असे पवार म्हणाले.

महायुतीत सर्व पक्षांची एकता-

"महायुतीत असणारे सर्व पक्ष एकत्र राहावे. विरोधकांनी लाडकी बहीणवर बोलू नये, त्यांनी दीड रुपया तरी दिला का? ही योजना पुढे सुरु हवी असेल तर महायुतीचे सरकार पुन्हा आणावे लागेल," असं पवार म्हणाले.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा कामाचा वेळ-

अजित पवार यांनी सांगितलं की, "आमचं सरकार 24 तास काम करत असतं. आमचे मुख्यमंत्री पहाटे 4 वाजेपर्यंत काम करत असतात आणि मी पहाटे 5 वाजता उठून कामाला लागतो. याचा अर्थ आमचं सरकार 24 तास काम करणारं आहे."

विकासकामे आणि पुराचे प्रश्न-

"महामार्गांमुळे कोल्हापूर शहरात पुराचे पाणी तुंबते. याबाबत आम्ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटलो आहोत आणि यावर लवकर तोडगा काढू," असं पवार यांनी सांगितलं.

आगामी निवडणुका-

"आपण कागल, चंदगड, गडहिंग्लज पुरते मर्यादित राहून चालणार नाही. राष्ट्रवादीचे अनेक मतदार संघात आमदार राहिलेला हा जिल्हा आहे. पुढे महापालिका, नगरपंचायत निवडणुकीत कस लागणार आहे," असं अजित पवार यांनी सांगितलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhakrishna Vikhe Patil : मला ५ वर्षे सत्ता देऊन पहा, यावर राधाकृष्ण विखे म्हणाले... सुजय राजकीय निर्णय घेण्यास सक्षम

Ziro Valley Tourism : भारतातल्या या ठिकाणाचं नावं आहे झिरो, जाणून घ्या का खास आहे हे शहर

Latest Marathi News Live Updates : अंधेरी पश्चिम लोखंडवाला परिसरात भीषण आग

अनंत-राधिकाच्या लग्नात येण्यासाठी कलाकारांना पैसे दिले गेले? अनन्या पांडेने सांगितलं सत्य, म्हणते-

IND vs BAN 1st Test Live : Rohit Sharma ६ धावांवर, शुभमन गिलचा भोपळा; २४ वर्षीय गोलंदाजाने भारताला दिले धक्के

SCROLL FOR NEXT