Aluminum pottery industry in crisis Declining demand for hair from China sakal
कोल्हापूर

ॲल्युमिनियम भांड्यांचा उद्योग संकटात

स्क्रॅपच्या दरात वाढ; चीनमधून केसांची मागणी घटल्याचाही परिणाम

अभिजित कुलकर्णी

नागाव : केसांची निर्यात थांबल्याने अॅल्युमिनियम भांडी निर्मितीचा उद्योग संकटात सापडला आहे. अॅल्युमिनियम स्क्रॅपची दरवाढ व तयार मालाच्या किमतीत मोठी घसरण होत असल्याने हा उद्योग बंदसदृश अवस्थेत आहे. केस गोळा करणारे व्यावसायिक केसांवर भांडी देतात. विशेष म्हणजे ग्रामीण भागात हा व्यवसाय तेजीत चालतो. अॅल्युमिनियम भांडी उद्योगाला थेट मार्केट उपलब्ध नसले तरी, केसांवर भांडी देण्याचा व्यवसाय कोटींची उलाढाल करून देतो.

केसांना अडीच ते साडेचार हजार रुपयांचा भाव मिळत असल्याने एक किलो केसांच्या मोबदल्यात पाच ते सात किलोपर्यंतची अॅल्युमिनियम भांडी देणे परवडते.कोराना आणि भारत व चीनमधील ताणलेले संबंध यामुळे चीनने केसांचा उठाव थांबवला आहे. कारण भारताने चीनला निर्यात होणाऱ्या केसांवर भारतातच प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रक्रिया झालेल्या केसांचा दर सात हजार रुपये प्रतिकिलो झाला आहे. त्यातच कच्च्या मालाच्या दरात वाढ झाली आहे. सहा महिन्यांत हा दर प्रतिकिलो ऐंशी रुपयांनी वाढला. मोठे व्यापारी जुनी भांडी घेऊन नवीन भांडी देतात. त्यामुळे अॅल्युमिनियम स्क्रॅपचा भाव तेच ठरवतात. कारण त्यांना हे माहीत आहे की, अॅल्युमिनियम भांड्यांना थेट खरेदीदार नाही. त्यामुळे ही वाढ कुणाकडून घ्यायची हाही कारखानदारांसमोर प्रश्नच आहे.

प्रमुख वैशिष्ट्ये

  • जिल्ह्यात सुमारे वीस भांडी कारखाने

  • सुमारे साडेतीनशे कामगार उद्योगात

  • अॅल्युमिनियम स्क्रॅप दरात प्रतिकिलो ८० रुपये वाढ

  • भट्टी, पोरिंग, पत्रा प्रेस, कलईच्या खर्चात वाढ

पाचचे होतात ४० हजार

गावागावातील महिला केस विंचरताना गळणारे केस साठवून त्यावर भांडी घेतात. हे केस साडेपाच हजार रुपये प्रतिकिलोने चीनचे व्यापारी खरेदी करतात आणि त्याचे गंगावन बनवून ते भारतीय बाजारपेठेत प्रतिकिलो चाळीस हजार रुपयांनी विकले जाते.

अॅल्युमिनियम स्क्रॅपचे दर वाढल्याने उत्पादक तयार मालाची किंमत वाढवून मागत आहेत. केसांवर भांडी देणाऱ्यांना केसांचे दर घसरत असल्याने भांडी देणे परवडत नाही.

- सर्जेराव डाफळे, श्रीराम मेटल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : भाजप 100 जागांवर आघाडीवर, सलग तीन निवडणुकांमध्ये केले शतक पार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूर आणि स्नेहा दुबेंमध्ये काट्याची टक्कर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

SCROLL FOR NEXT