अमोल येडगे २०१४ च्या बॅचचे आय. ए. एस अधिकारी आहेत. त्यांनी जळगाव येथे प्रशिक्षण कालावधी पूर्ण केला. त्यानंतर हिंगोली आणि नाशिक येथे सहायक जिल्हाधिकारी म्हणून काम केले.
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधक व प्रशिक्षण परिषदेचे संचालक अमोल येडगे (Amol Yedge) यांची कोल्हापूरचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली. जिल्हाधिकारी राहुल रेखावार (Collector Rahul Rekhawar) यांची नियुक्ती येडगे यांच्या पदावर झाली.
अपर मुख्य सचिव (सेवा) नितीन गद्रे यांनी काल सायंकाळी सहा वाजता याबाबतचे आदेश जारी केले. जिल्हाधिकारी रेखावार यांनी त्यांच्या कार्यकाळात अंबाबाई मंदिर (Ambabai Temple) परिसर विकास आराखडा बनवला. त्या प्रक्रियेला सुरुवात केली. त्यांनी मोठ्या संख्येने भटके-विमुक्त समाजातील नागरिकांना रेशन कार्ड मिळवून दिले. अमेरिकन मिशनच्या जमिनीचा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लावला.
याशिवाय जिल्ह्याच्या पर्यटनविकासासाठी प्रयत्न केले. ‘मधाचे गाव पाटगाव’ ही संकल्पना राबवली. ‘शासन आपल्या दारी’ आणि राजर्षी शाहू कृतज्ञता पर्व स्मृती शताब्दी वर्ष यांचे यशस्वी आयोजन केले. पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी कृती आरखडा बनवण्यातही त्यांचे योगदान आहे. नूतन जिल्हाधिकारी येडगे मूळचे कऱ्हाडचे आहेत. त्यांनी पुण्याच्या शासकीय अभियांत्रिक महाविद्यालयातून पदवी घेतली आहे.
ते, २०१४ च्या बॅचचे आय. ए. एस अधिकारी आहेत. त्यांनी जळगाव येथे प्रशिक्षण कालावधी पूर्ण केला. त्यानंतर हिंगोली आणि नाशिक येथे सहायक जिल्हाधिकारी म्हणून काम केले. नाशिक येथे त्यांच्याकडे आदिवासी प्रकल्पाधिकारी म्हणूनही कार्यभार होता.
त्यांनी अमरावती आणि बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही काम केले आहे. ते २०२१ मध्ये यवतमाळचे जिल्हाधिकारी होते. त्यानंतर त्यांच्याकडे माहिती तंत्रज्ञान प्रकल्पाचे संचालक म्हणनूही पदभार होता. सध्या ते महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक म्हणून कार्यरत आहेत.
कोल्हापुरात काम करण्याची संधी मिळाली, ही आनंदाची गोष्ट आहे. क्रीडा क्षेत्रात जिल्ह्यातील खेळाडूंनी मोठे योगदान दिले आहे. जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राची व्याप्ती अधिक वाढावी, यासाठी विशेष प्रयत्न करण्याचा मानस आहे. आरोग्य, शिक्षण आणि पाणीपुरवठा आदी पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी विविध उपाययोजना राबवणार आहे. सर्वांना सोबत घेऊन प्रशासन अधिक गतिमान आणि लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न करू.
-अमोल येडगे, नूतन जिल्हाधिकारी
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.