Anti-bribery Department Action Against Women Officer esakal
कोल्हापूर

Chandgad Crime : ठेकेदाराकडून 'लाच' घेताना महिला उपअभियंता जाळ्यात; चंदगडात 'लाचलुचपत'ची धडक कारवाई

कांबळे यांनी संबंधित ठेकेदाराकडे तीन टक्के दराने ३३ हजार रुपयांची मागणी केली होती.

सकाळ डिजिटल टीम

ठाणे जिल्ह्यातून बदलीने येथे आलेल्या कांबळे यांनी सुरुवातीपासूनच आपली ‘वेगळी’ भूमिका ठेवली होती.

चंदगड : येथील पंचायत समितीकडील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या (Rural Water Supply Department) उपअभियंता सुभद्रा लक्ष्मण कांबळे यांना जलजीवन मिशनचे काम करणाऱ्या ठेकेदाराकडून पंचवीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.

गुरुवारी (ता. २८) दुपारी ही कारवाई करण्यात आली. आज त्यांना गडहिंग्लज येथील सेशन कोर्टात (Gadhinglaj Sessions Court) हजर केले असता जामिनावर मुक्तता करण्यात आली. तक्रारदार हे पोट ठेकेदार असून घुल्लेवाडी (ता. चंदगड) येथील नळ पाणीपुरवठा योजनेच्या सुधारीकरणाचे काम त्यांनी घेतले होते.

त्याचे बारा लाख रुपये बिल मंजूर झाले होते. ते काढून देण्यासाठी कांबळे यांनी संबंधित ठेकेदाराकडे तीन टक्के दराने ३३ हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती २५ हजार रुपये देण्याचे ठरले. गुरुवारी पंचायत समिती कार्यालयातच त्यांनी ते स्वीकारत असताना लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक सरदार नाळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक संजीव बंबरगेकर, पोलिस हेड कॉंस्टेबल विकास माने, सुनील घोसाळकर, सचिन पाटील,  पूनम पाटील, विष्णू गुरव यांच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले.

येथील पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ठाणे जिल्ह्यातून बदलीने येथे आलेल्या कांबळे यांनी सुरुवातीपासूनच आपली ‘वेगळी’ भूमिका ठेवली होती. बेळगाव येथील हनुमान नगरमध्ये त्या भाडोत्री राहत होत्या. विविध गावातील पाणी योजनेच्या कामात अधिकारी म्हणून  स्थानिक नागरिकांना विश्वासात घेण्याऐवजी आपल्या मतावर ठाम राहिल्याने वाद निर्माण झाले होते.

त्यांच्या विभागातील कर्मचाऱ्यांना सुद्धा वेठीला धरल्याच्या तक्रारी होत्या. याच मुद्द्यावरून कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करून तक्रार नोंदवली होती. काही कर्मचाऱ्यांनी त्यांना कंटाळून अन्य तालुक्यात बदली करून घेतल्याचे सांगितले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीसाठी भाजपचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर दाखल

Mumbai Assembly Election 2024 Results Live : मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT