निपाणी : पिरणवाडी येथे विरोध असताना रात्रीत संगोळ्ळी रायण्णा यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. अशाच प्रकारे मणगुत्ती (ता. हुक्केरी) येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उभारणी केली होती. मात्र त्यावेळी नेतेमंडळी, पोलिसांसह अन्य कोणाचा पाठिंबा मिळाला नाही. दोन्ही प्रकरणात वेगळ्या न्यायासारखी परिस्थिती दिसत आहे. मग त्यावेळी मणगुत्ती ग्रामस्थांचे काय चुकले, असा प्रश्न समोर येत असून आता नेत्यांसह पोलिस लक्ष्य बनले आहेत.
मणगुत्ती (ता. हुक्केरी) येथील बसस्थानकाजवळ ५ ऑगस्ट रोजी प्रतिष्ठापना केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा ७ ऑगस्ट रोजी रात्री उतरविण्यात आला. त्यानंतर तणावपूर्ण वातावरण बणले होते. ९ आॅगस्टला शिवभक्तांनी एकवटून शिवपुतळ्याची मागणी केली. अखेर ११ आॅगस्टला मणगुत्ती, बेनकनहोळी व बोळशनट्टी या तिन्ही गावातील पंचमंडळींची बैठक झाली. त्यात छत्रपती शिवरायांसह पाच महापुरूषांच्या पुतळ्यांची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय होऊन भूमिपूजन करून पडदा पाडण्यात आला.
मणगुत्ती ग्रामपंचायतीत छत्रपती शिवाजी महाराज, महर्षी वाल्मिकी, श्रीकृष्ण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळा प्रतिष्ठापनेचा ठराव झाला आहे. त्यानुसार शिवपुतळ्याची प्रतिष्ठापना केली होती. मात्र केवळ परवानगी घेतली नव्हती. एवढे तांत्रिक कारण पुढे करण्यात आले. पिरणवाडीतील पुतळा प्रकरणही वेगळे नव्हते. पण मणगुत्तीला विरोध व पिरणवाडीला पाठिंबा, असे चित्र दिसून आले. त्याची चर्चा आता सर्वत्र होताना दिसत आहे.
भूमिका वेगळी का?
छत्रपती शिवाजी महाराज असोत की संगोळ्ळी रायण्णा हे दोघेही महापुरूष होते. त्यांनी देशाला एक वेगळी दिशा दिली. त्यांचे विचार व स्फूर्ती पुढील पिढीला मिळण्यासाठी स्मारक म्हणून पुतळे उभारण्यात येतात. पण दोन्ही तणावाच्या वेळी संबंधित मंडळींची भूमिका वेगळी का? असा प्रश्न समोर येत आहे.
हे पण वाचा - कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरच पोलिसांच्या उपस्थितीत अंधारात बसवला रायण्णा यांचा पुतळा
`मणगुत्ती येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता. पण तांत्रिक कारण पुढे करून तो उतरविण्यात आला. पिरणवाडीतील संगोळ्ळी रायण्णा यांच्या पुतळ्याबाबत मात्र सकारात्मक भूमिका घेण्यात आली. प्रशासन व पोलिसांचा हा दुटप्पीपणा निषेधार्ह आहे.`
-अॅड. भीमराव कोतेकर, मणगुत्ती-कोल्हापूर
संपादन - धनाजी सुर्वे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.