Indian Army Soldier esakal
कोल्हापूर

Army Jawan : पत्नीने साथीदाराच्या मदतीने हात, पाय, डोळे बांधून विष पाजलेल्या 'त्या' जवानाचा मृत्यू

Army Jawan : अमर हे पंधरा वर्षांहून अधिक कालावधीपासून भारतीय सैन्यदलात कार्यरत होते. अमर सध्या जम्मू येथे कार्यरत होते.

सकाळ डिजिटल टीम

याप्रकरणी पत्नी तेजस्विनीला पोलिसांनी तातडीने अटक करून न्यायालयामोर हजर केले होते. परंतु, घटनेनंतर सचिन हा पसार झाला.

गडहिंग्लज : पंधरवड्यापूर्वी पत्नीसह तिच्या साथीदाराने हात, पाय, डोळे बांधून विष पाजलेल्या जवानाचा (Army Jawan) उपचार सुरू असताना पुण्यात शनिवारी (ता. ३) रात्री उशिरा मृत्यू झाला. अमर भीमगोंडा देसाई (वय ३९, रा. नूल, ता. गडहिंग्लज) असे या मृत जवानाचे नाव आहे. गेले चौदा दिवस मृत्यूशी सुरू असलेली त्यांची झुंज अखेर अयशस्वी ठरल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, वडील व दोन भाऊ असा परिवार आहे. आज (ता. ५) सकाळी त्यांचे पार्थिव नूल गावी येणार आहे. गावातील प्रमुख मार्गांवरून पार्थिवाची मिरवणूक काढण्यात येणार असून, न्यू इंग्लिश स्कूलच्या (New English School) मैदानात अंत्यदर्शनसाठी त्यांचे पार्थिव ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर गावच्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक गजानन सरगर यांनी दिली.

दरम्यान, या घटनेतील मुख्य संशयित त्याची पत्नी तेजस्विनी अमर देसाई (वय ३३) हिच्यासह तिचा साथीदार सचिन परशराम राऊत (वय ३०, रा. हेब्बाळ कसबा नूल, ता. गडहिंग्लज) याच्याविरुद्ध पोलिसांत जीवे ठार मारण्याचा गुन्हा दाखल झाला असून, आता जवान अमर यांच्या मृत्यूने त्यांच्याविरुद्ध खुनाचे कलम समाविष्ट करणार असल्याचे सरगर यांनी सांगितले. तेजस्विनी सध्या न्यायालयीन कोठडीत असून, साथीदार सचिन हाही विष पिल्याने त्याच्यावर बेळगावच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अमर हे पंधरा वर्षांहून अधिक कालावधीपासून भारतीय सैन्यदलात कार्यरत होते. अमर सध्या जम्मू येथे कार्यरत होते. ३ जुलैला ते सुटीवर आले होते. ते मुलांच्या शिक्षणासाठी पत्नीसह येथील संकेश्वर रोडवरील पाटणे पाईप कारखान्यामागे बसवेश्वरनगरमध्ये स्वतःच्या बंगल्यात राहत होते. १८ जुलैच्या रात्री साडेनऊच्या सुमारास बेडवर झोपलेल्या अमर यांचे हात, पाय व डोळे बांधून पत्नी तेजस्विनी व साथीदार सचिन या दोघांनी संगनमताने त्यांना विष पाजले होते. याप्रकरणी पत्नी तेजस्विनीला पोलिसांनी तातडीने अटक करून न्यायालयामोर हजर केले होते. परंतु, घटनेनंतर सचिन हा पसार झाला. मात्र, तोही विष प्यायला आहे.

दरम्यान, जखमी अमर यांना पहिल्यांदाच सीपीआरमध्ये दाखल केले होते. त्यानंतर लगेचच त्यांना पुण्यातील सैनिक हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथेच त्यांच्यावर उपचार सुरू असताना अमर यांची रात्री प्राणज्योत मालविली. जिल्ह्यात खळबळ उडवून देणाऱ्या या घटनेबाबत तीव्र असंतोष होता. घटनेनंतर अनेक संघटनांनी निवेदने देऊन दोषींवर कडक कारवाईची मागणीही केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Imtiaz Jaleel : बूथ कॅप्चर भाजपने केले अन् गुन्हा माझ्यावर कसा? इम्तियाज जलील

AUS vs IND 1st Test: भारतीय फलंदाजी ऑस्ट्रेलियन वेगवान माऱ्यासमोर कोलमडली! कसाबसा गाठला १५० धावांचा टप्पा

Nashik Vidhan Sabha Election : ‘महायुती-महाविकास’चे अपक्ष उमेदवारांवर लक्ष; वरिष्ठ नेत्यांकडून अपक्ष उमेदवारांशी संपर्क

Nanded Assembly Election 2024 : जातीय मतविभाजनाचा फटका कोणाला बसणार?

Uddhav Thackeray: निकालाची धडकी? उद्धव ठाकरेंचा प्लॅन बी! 'लाईव्ह'चं शस्त्र उगारलं, पुन्हा दगा टाळण्यासाठी उमेदवारांना एकत्र आणलं

SCROLL FOR NEXT