61st National Exhibition  sakal
कोल्हापूर

कलापूरच्या ५२ विद्यार्थ्यांच्या कलाकृती राज्य प्रदर्शनात

एकसष्ठावे प्रदर्शन; पेंटिंगसह शिल्पकृतींचाही समावेश

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : राज्य कला संचालनालयातर्फे होणाऱ्या यंदाच्या एकसष्ठाव्या राज्य कला प्रदर्शनात शहरातील तीन महाविद्यालयांतील तब्बल ५२ विद्यार्थ्यांच्या कलाकृतींची निवड झाली आहे. रा. शि. गोसावी कलानिकेतन महाविद्यालयातील एकवीस, कलामंदिर महाविद्यालयातील सोळा तर दळवीज् आर्टस् इन्स्टिट्यूटच्या पंधरा विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचा त्यामध्ये समावेश आहे. दरम्यान, यंदा व्यावसायिक विभागाबरोबरच विद्यार्थ्यांनीही प्रदर्शनात बाजी मारली आहे.

कलानिकेतन महाविद्यालयाच्या उपयोजित कला विभागातून अभिजित भोसले, सुशांत सुतार, विनायक कांबळे, प्रथमेश पाटील, पायल लाड, आरमान मुल्लाणी, प्रणव माळी, समृद्धी मंडलिक, श्‍वेता पाटील, अद्वेत रामदासी, श्रुती जाधव यांच्या तर मूलभूत अभ्यासक्रम विभागात चेतना सुतार, अनुराधा पवार, तनया खटावकर, शार्दुल कुंभार, ओम म्हामुलकर, प्रथमेश सुतार, सिद्धी जाधव यांच्या आणि एटीडी विभागात आयेशा शेख, श्रावणी पवार, अनुराधा कोळी यांच्या कलाकृतींची निवड झाली आहे.

दळवीज् आर्टस् इन्स्टिट्यूटच्या डिप्लोमा पेंटिंग विभागातून साक्षी लोणकर, ॲडव्हान्स पेंटिंग विभागातून प्रणोती चौगुले, केदार पोवार, सृष्टी पाटील, इंटरमिजीएट पेंटिंगवर्गातून साक्षी पांगिरे, धोंडी ढवळे, ऋतुजा जाधव, एलिमेंटरी पेंटिंग विभागातून आर्या माने, आकाश जाधव, कशिश पटेल, कशिश अडसूळ, रोहिणी कांबळे, शिवयोगी बडिशेर, मूलभूत अभ्यासक्रम वर्गातून प्रतीक कांबळे, स्नेहल खराडे यांच्या कलाकृतींची निवड झाली आहे. स्नेहल आणि शिवयोगी यांच्या दोन कलाकृती प्रदर्शनात असतील.

कलामंदिर महाविद्यालयाच्या फाउंडेशन विभागातील स्वप्निल कुंभार, पेंटिंग विभागातील सुप्रिया सुतार, ओंकार वागवेकर, शिल्पकला विभागातील दिगंबर कुंभार, प्रथमेश कुंभार, केवल सावंत, विशाल दुग्गल, विकास हरमलकर, सिद्धेश सुतार, रविचंद्र गोरे, जीवन कुंभार, वैभव पाटील, कैलास कुंभार, स्वागत कुंभार, आदित्य कुंभार, वैभव अटाळकर यांच्या कलाकृतींची प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilesh Rane : आमदार होताच निलेश राणेंची धमकी, म्हणाले, ...तर त्याचा जागेवरच बंदोबस्त करु

Pune Fake Voting: पुणे शहरातील सर्व ८ मतदारसंघांत फेक मतदान! कोथरुड अन् वडगावशेरीत सर्वाधिक

Ladki Bahin Yojana: आनंदाची बातमी, या तारखे पासून लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये, मोठी अपडेट आली समोर!

Mumbai Fire: रात्रीच्या वेळी मुंबईजवळ भीषण आग; ६ बस जाळून खाक, वाचा नक्की काय घडलं

IPL Mega Auction 2025: Mumbai Indians ने पायावर धोंडा मारून घेतला; 32.5 cr खिशात असूनही चांगला खेळाडू जाऊ दिला

SCROLL FOR NEXT