कोल्हापूर : कोणीही कितीही संपर्क अभियाने राबवावीत. कितीही पक्ष विस्तार करावा. आगामी प्रत्येक निवडणूकीत भाजप (BJP) स्वबळावर लढून शिवसेनेला 'पंढरपूरच' दाखवणार. अशी टिका भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार (aashish shelar) यांनी शिवसेनेवर केली. आज त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
आमदार शेलार हे आज कोल्हापूर (kolhapur) दौऱ्यावर आले होते. त्यांनी ज्येष्ठ विचारवंत प्रा.डॉ.एन.डी.पाटील (N.D. Patil) यांच्या घरी जावून त्यांची भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीची त्यांनी विचारपूस केली. त्यानंतर माजी आमदार अमल महाडिक (amal mahadik) यांच्या घरी जावून न्याहारी केली. त्यानंतर त्यांनी पक्ष कार्यालयात शहर आणि ग्रामीण कार्यकारणीची बैठक घेतली. आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपण स्वबळावर लढवणार आहोत. त्यामुळे बूथ रचना पक्की करा. अधिकाधिक सदस्य बनवून पक्षाला घराघरात पोहचवा. असे मार्गदर्शन त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना केले. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
शिवसेनेने (shivsena) संपर्क अभियान सुरू केले असल्याचे सांगून त्या बद्दल विचारल्यावर शेलार म्हणाले, ‘कोणीही कितीही अभियाने करोत. पक्ष विस्तार करोत. पण आगामी होणाऱ्या सर्व निवडणुकात शिवसेनेला पंढरपूरच दाखवणार'. इडी कारवाई वरून होणाऱ्या टिकेबाबत शेलार म्हणाले, 'ईडी, इन्कम टॅक्स हे कोणाच्याही मागे लागत नाहीत. ते गुन्हेगारांच्या मागेच लागतात. त्यामुळे ही राजकीय कारवाई नाही. ज्याला कर नाही त्याला डर कशाला पाहीजे. पण स्वतःवरचे आरोप लपवण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते राजकीय उद्देशाने कारवाई केली असे म्हणातात. ती त्यांची रणनिती आहे.
या वेळी जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, जिल्हाध्यक्ष (महानगर) राहुल चिकोडे, देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव, सरचीटणीस अशोक देसाई, हेमंतर अराध्ये, माजी नगरसेवक अजित ठाणेकर, विजयसिंह खाडे-पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
पवारांचे विधान बरोबर
नाना पटोले यांनी केलेल्या टिकेवर आमदार शेलार म्हणाले, राजकीय हवामान बदलले की नाना पटोले यांची विधाने बदलतात. त्यामुळे त्यांच्या विधानाकडे फारसे गांभिर्याने पाहाण्याची गरज नाही. नाना पटोले हे छोटा माणूस असल्याची टिका शरद पवार यांनी केली होती. ते बरोबरच आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.