Kolhapur News sakal
कोल्हापूर

Kolhapur News: मतांचा दावा, उमेदवारीची हवा इच्छुकांचे शड्डू; पालिकेच्या चार सदस्यीय प्रभाग रचनेच्या शक्यतेवर तयारी

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर: विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत असताना शहरातील काही प्रभागांत महापालिकेच्या निवडणुकीच्या हालचालीही सुरू झाल्या आहेत. चार सदस्यीय प्रभाग होण्याच्या शक्यतेने आपापल्या भागातील ताकदवान उमेदवारांची नावे नेत्यांसमोर आणली जात आहेत. लोकसभा निवडणुकीत भागाभागांत मिळालेल्या मतांचा यासाठी दाखला देण्यात येत आहे. त्यामुळे नवीन इच्छुक, तसेच माजी नगरसेवकांच्या नावांची चर्चा भागांमध्ये सुरू झाली आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे. उमेदवारीसाठी ठिकठिकाणी फिल्‍डिंग लावली जाऊ लागली आहे. पण, त्याबरोबरच गेल्या चार वर्षांपासून निवडणुकीच्या प्रतीक्षेत असलेल्या महापालिकेसाठीच्या इच्छुकांकडूनही फिल्‍डिंग लावण्यास सुरुवात झाली आहे. विधानसभेनंतर पुढील वर्षात निवडणूक लागणार असे चित्र आहे.

प्रभागांमध्ये अनेक उमेदवार एखाद्या भागातील मिळणाऱ्या मोठ्या मतांमुळे विजयी होत होते. त्या भागातील कार्यकर्त्यांना त्यांची ताकद समजून आल्यामुळे आता त्यांनी आपल्यातील उमेदवार उभे करण्याची तयारी चालविली आहे. त्यासाठी आमदारकीच्या निवडणुकीसाठी येणाऱ्या नेत्यांच्या कानावर आपल्या उमेदवारांची नावे घालण्यास सुरुवात केली आहे.

जुना व नवीन माणूस दोघेही हवे असल्याने त्यांच्याकडून आताच कोणाला दुखावले जाणार नाही. मात्र, वेगवेगळ्या भागांतील नवीन इच्छुकांनी जोरदार कामाला सुरुवात केली आहे. त्यातून आंदोलने, भागातील कामांना गती दिली जाऊ लागली आहे.

पक्षीय पातळीवर निवडणूक होणार असल्याने निवडून येण्यासाठी उमेदवाराला पक्षाची आवश्‍यकता आहे. त्यासाठी आपापल्या नेत्यांकडे आपली वर्णी लावली जात आहे. यात कुणी थेट नाव सांगत आहेत, तर काहीजण समित्यांवर जाण्याचा आग्रह धरत आहेत. परिसरातील आजूबाजूच्या प्रभागांत ताकद असणाऱ्या माजी नगरसेवकांनी मात्र आपला पत्ता अजून खोललेला नाही.

विरोधी गटाकडून कोण तयारी करीत आहे, नवीन कोण आहे, कोण आपल्याला मदत करू शकतो, कोणाचा फटक बसू शकतो, याचा अंदाज घेत आहेत. यामुळे जरी उघडपणे निवडणुकीची चर्चा होत नसली तरी इच्छुकांच्या तसेच नेत्यांच्या पातळीवर महापालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे.

प्रभागरचना चार जणांची की बदलणार

लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपच्या विरोधात जनमत दिसत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत काय होईल, याचा अंदाज घेतला जात आहे. भाजपचे मत चार सदस्यीय प्रभाग रचनेच्या बाजूने आहे. पण, विधानसभेत जर चित्र बदलले, तर हा निर्णय बदलला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आगामी विधानसभेवर महापालिकेच्या निवडणुकीचे चित्र अवलंबून आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT